महाराष्ट्र वेदभुमी

पहा ...शेवाळी धरलेल्या भिंतीवरच रंगाची थुकपट्टी नागरिकांच्या पैशाची अशी होतेय उधळपट्टी,😱😱


रोहा दि २९ सप्टें. विशेष प्रतिनिधी

नागरिकांच्या पैशाची ही अशी उधळण..यावर कारवाई झालीच पाहिजे

 रोहा नगरपालिकेच्या पार्किंगला निकृष्ट कामाचा रंग रोहेकरांना नागरिकांना पाहायला मिळाला... रोहा नगरपालिकेच्या माध्यमातून रोहा मुरुड रस्त्यावरील ए पी जे अब्दुल कलाम आझाद वाहनतळाला पिवळा रंग मारण्यात येतो आहे... रंग देण्यापूर्वी भिंत स्वच्छ केली नसल्याने शेवाळलेल्या भिंतीवरच नगरपालिकेला रंगाची थुकपट्टी लावत असल्याचे निदर्शनास आले... 


बांधकाम विभाग जबाबदार असून याची संबंधितांनी गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी

रोहा नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदार करत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून यावर कारवाई होणे आवश्यक आहे... रोहा नगरपालिका नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करते, याला प्रभारी मुख्याधिकारी पंकज भुसे आणि बांधकाम विभाग जबाबदार असून याची संबंधितांनी गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post