महाराष्ट्र वेदभुमी

कोकण पदवीधर मतदार नोंदणी अभियान



माणगाव प्रतिनिधी:(सिकंदर आंबोणकर) 

कोकण विभागातील सर्व क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेल्या तरूण तरुणींनी आपली पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी...

नोंदणी साठी खालील कागदांच्या झेरॉक्स  प्रति


*१) मार्कशिट किंवा convocation प्रमाणपत्र

*२) आधार कार्ड

*३) इलेक्शन कार्ड

*४) रेशन कार्ड किंवा लाईट बिल

*५) नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा PAN कार्ड

*६) (नोंदणी करणारा मतदार हा ऑक्टोबर २०२० पर्यंत पदवीधर झालेला असावा त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये.)

*७) एक पासपोर्ट साइज कलर फोटो

*८) सर्व झेरॉक्स वर आपली सही करावी.

पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी मोहीम कोंकण आणि मुंबई विभाग

कोंकण आणि मुंबई विभागाची पदवीधर मतदारसंघाची नाव नोंदणी मोहीम ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे...यामध्ये जुन्या यादीत असलेल्या मतदारांनी सुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे...याची नोंद घ्यावी...

कोण करू शकतो नोंदणी?

१.११.२०२० पूर्वी ज्यांचे Graduation/ पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती या मतदार म्हणून नाव नोंदवू शकता व ज्यांचे वय १८ पूर्ण आहेत ते व्यक्ती...

लागणारी कागदपत्रे

नमुना नंबर १८ भरून, त्यासोबत पदवी शिक्षण पूर्ण झालेली कागदपत्रे, पत्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा व फोटो आवश्यक

अर्ज कुठे भरणार

प्रत्यक्ष अर्ज भरून (हार्डकॉपी) जवळच्या तहसील कार्यालय/ उपविभागीय कार्यालय येथे जमा करू शकता किंवा पोस्टाने पाठविताना सर्व कागदपत्रे ही राजपत्रित अधिकारी/ पब्लिक नोटरी यांच्याकडून प्रमाणित करून पाठवू शकता...

महत्वाचे:- पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी करताना व्यक्तीला प्रत्यक्ष जाऊन नोंदणी अर्ज जमा करायचा आहे.. एकगठ्ठा नोंदणी किंवा सरकारी कार्यालयाच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमधून होणार नाही याची नोंद घ्यावी...

अधिक माहितीसाठी शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर २०२३ पहावा... मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/forms.aspx  हे बघावे... तसेच नाव नोंदणीसाठी...नमुना नंबर १८ सोबत जोडलेला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post