महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड विभागातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप.

 


कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) : 

कोलाड, सुतारवाडी,खांब विभागातील अनंत चतुर्दशीच्या दहा दिवसांच्या सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन 

दहा दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनालाही पावसाची संततधार गणेश भक्तांनी बाप्पाचा जयजयकार करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात भक्तिमय वातावरणात कोलाड, सुतारवाडी,खांब विभागातील अनंत चतुर्दशीच्या दहा दिवसांच्या सार्वजनिक ९ व खाजगी घरगुती ४० आशा एकूण ४९ बाप्पांचे विसर्जन ढोल ताशे, खालू बाजा, डीजेच्या तालावर वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत गणेश भक्तांनी गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्ती भावनेने निरोप दिला...

गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली
कोलाड परिसर व कोलाड विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी गणपतीपूर्वीच विसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव व नदी परिसर स्वच्छता करण्यात आली होती. दुपारी चार वाजल्यानंतर वाजत गाजत, तर काही गुलाल उधळत, लेझिम, टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात व वाजत गाजत श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती... एका मागुन एक काही ठिकाणी खाजगी बाप्पांपाठोपाठ घरगुती गणपती विसर्जनासाठी आपल्या परिसरातील नदी किनारी व तलाव ठिकाणी निघाले होते...तत्पुर्वी कोलाड पोलिस प्रशासनाच्या वतीने दुपारपासूनच कोलाड विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी मुबंई गोवा मार्गावरील सुकेळी खिंड ते भुवन तर काही ठराविक ठिकाणी गस्त घालण्यात आली


कोलाड पोलीस स्टेशन परिसरात एकूण १०६९ गणेश बाप्पांची आगमन होत करण्यात आली होती स्थापना 

कोलाड पोलीस स्टेशन परिसरात एकूण १०६९ गणेश बाप्पांची आगमन होत स्थापना करण्यात आली... व २६४ गौरींचे आगमन झाले होते...दीड दिवसाचे गणपती खाजगी ७८०, पाच दिवसाचे खाजगी ११३८ व गौरी २५४ सात दिवसाचे खाजगी ०१ तर दहा दिवसाचे सार्व. ९ खाजगी ४० असे एकुण सार्व व खाजगी घरगुती १०६९ गौरी २५४ तसेच कोलाड पोलिस ठाणे हद्दीतील शेवटी दीड दिवस,पाच दिवस,सात दिवस,व दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन शांततेत व भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप दिला तर यावेळी दीड दिवसांच्या, पाच दिवसांच्या व गौरी विसर्जनात,सात दिवसांचे तसेच शेवटी दहा दिवसांचा गणपती बाप्पांच्या विसर्जनात ही पावसाची संततधार तर धो धो पाऊस असल्याने गणेश भक्त गणांचा हिरमुड झाला तरी देखील लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात गजर करत भावपूर्ण निरोप दिला...

तलाव, कुंडलिका नदीपात्र,व महीसदरा किनारी भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन 

भर पावसातही मोठ्या भक्तीने व श्रद्धेने भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत परिसरातील तलाव, कुंडलिका नदीपात्र,व महीसदरा किनारी भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिसांनी विसर्जन मार्गावर आणि नदी किनारी तसेच मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंड ते भुवन पर्यंत चोख बंदोबस्त ठेवले होते. कोलाड पोलीस स्टेशन हद्दीतील हद्दीतील व परिसरातील सार्वजनिक ९ व खाजगी ४० बाप्पांचे विसर्जन यावेळी करण्यात आले असल्याची मावहीती कोलाड पोलिसानी दिली...

Post a Comment

Previous Post Next Post