महाराष्ट्र वेदभुमी

ईद-ए-मिलाद या सणाची सार्वजनिक सुट्टी गुरुवारी२८ सप्टेंबर ऐवजी शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी

 


माणगाव प्रतिनिधी (सिकंदर आंबोणकर)

दि.२७/०९/२०२३

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या२४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद सणाची सुट्टी दि.२८सप्टें.२०२३

राज्य शासन आणि रिझर्व बॅंकेने गुरुवार,दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी असणारी सुट्टी शुक्रवार,दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर केल्याने या दिवशी शासकीय कार्यालये आणि बॅंका सुरु राहणार आहेत...सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव रो.दि.कदम-पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या२४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार, दि.२८ सप्टेंबर २०२३रोजी दर्शविण्यात आलेली आहे

दोन्ही समाजात शांतता,सामाजिक सलोख्याच्या हेतूने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी २८सप्टें ऐवजी २९सप्टेंबरला

ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतात...यावेळी जुलूस कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते...तथापि, यावर्षी गुरुवार, दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदू धर्मियांचा अनंत चतुदर्शी हा सण आहे...अनंत चतुदर्शीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मूर्तींची मोठी मिरवणूक काढण्यात येते...नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदू बांधवांची मोठी गर्दी होत असते...यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार,दि.२८ सप्टेंबर ऐवजी शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे...

भारतीय रिझर्व बॅंकेचे महाप्रबंधक आर.सुदिप यांनीही याबाबत  प्रसिध्दीस दिले परिपत्रक

त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व बॅंकेचे महाप्रबंधक आर.सुदीप यांनीही याबाबत परिपत्रक प्रसिध्दीस दिले असून,गुरुवार दि.२८ सप्टेंबर ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post