महाराष्ट्र वेदभुमी

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने उलवेनोड वासियांना १० वर्षांनी मिळाली स्मशानभुमी





उरण प्रतिनीधी (विठ्ठल ममताबादे )

अंत्यविधीसाठी नातेवाईकांना खारघर, बेलापूर येथे जावे लागत होते...महेंद्रशेठ घरत मागील दोन ते तीन वर्षापासून पाठपुरावा

सिडको विकसित करत असलेल्या उलवे नोड वासियांना 10 वर्षापासून हक्काची स्मशानभुमी  नव्हती...अंत्यविधीसाठी नातेवाईकांना खारघर, बेलापूर येथे जावे लागत होते... परंतू रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे मागील दोन ते तीन वर्षापासून स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करत होते...अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश असुन सोमवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते उलवेनोड स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले...महेंद्रशेठ घरत हे नेहमिच  गावांच्या विकासासाठी रस्ते, समाज मंदिरे गटारे, हायमास्ट अशी लोकपयोगी कामे करत असतात...खारकोपर रस्त्याच्यावेळी अडथळा येणारा घर त्यांनी स्वतःच्या खर्चातून बांधून रस्त्याला मार्ग मोकळा केला...


स्वर्गीय दि.बा.पाटील यांच्यानंतर समाजासाठी कार्य करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेव नेते

स्वर्गीय दि.बा.पाटील साहेबांच्या नंतर समाजासाठी कार्य करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेव नेते आहेत...या स्मशानभूमीच्या लोकार्पण प्रसंगी माजी उपसरपंच सचिन घरत, ग्रा.पंचायत सदस्य अरुण कोळी, रोशन म्हात्रे, राकेश घरत, सचिन येरुणकर तसेच आम्ही उलवेकर मित्रमंडळाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या... हक्काची स्मशानभूमी मिळवून दिल्याबद्दल उलवे वासियांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post