महाराष्ट्र वेदभुमी

समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो : महेंद्र धामणसे



माणगाव ( डाॅ आरिफ पांगारकर ) 

पञकार  संतोष घरटकर यांना सकल मराठा सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजभुषण पुरस्कार देऊन सन्मानित

समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार महाड मधील सकल मराठा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र धामणसे यांनी व्यक्त केले...सकल मराठा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद सरवणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने महाड मधील जेष्ठ पञकार तथा रायगड जिल्हा संघर्ष पञकार असोसिएशन या संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संतोष घरटकर यांचा सकल मराठा सेवाभावी संस्थेच्या वतीने नुकताच समाजभुषण पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला... दरम्यान या गोड आणि आनंदी अशा सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना   सकल मराठा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र धामणसे यांनी पञकार घरटकर यांच्या सामजिक कार्याचे विशेष शब्दात कौतुक केले...समाजात जे जे लोक चांगलं काम करीत आहेत त्या सर्वांचा सकल मराठा सेवाभावी संस्थेला निश्चितच हेवा आणि अभिमान वाटतो...असेही महेंद्र धामणसे यांनी या प्रसंगी बोलुन दाखवले... 

 पञकार संतोष घरटकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

  सदर कार्यक्रम प्रसंगी सकल मराठा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र धामणसे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोज धामणसे यांच्यासह सकल मराठा सेवाभावी संस्थेचे अजय सकपाळ, कमलेश पवार,रोहीत गोविलकर, गणेश पवार,ज्ञानेश्वर धनावडे,अरुण जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते...या सर्वांनी पञकार संतोष घरटकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post