महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुका येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व नगरपालिका ग्रामपंचायत पक्ष बांधणीची जय्यत तयारी

 



रोहा धाटाव प्रतिनीधी(महेश वाडकर)

गोविंदाच्या स्पर्धेसाठी उंच उंच मानवी मनोरे रचून किताबावर आपले नाव कोरण्यासाठी गोविंद पथकांची तयारी 

 रोहा तालुक्यामध्ये राजकीय घडामोडी पाहता प्रत्येक जण आपापले पक्ष बांधण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असून सदर येणारा गोपालकाळा उत्सवाची.तयारी खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे... प्रत्येक पक्ष जनसंख्या एकत्र करण्यासाठी तसेच आपले वर्चस्व दाखवण्यासाठी लाखोंच्या दहीहंडीची स्पर्धा भरवत असल्याचे चित्र रोह्यामध्ये दिसून येत आहे...त्यामुळे रोहा तालुक्यातील प्रत्येक गावोगावी गोविंदा पथक जोरदार तयारी करताना व आपल्या गावाचे नाव तालुक्यामध्ये कसे वाढेल याचे प्रयत्नात आहेत... त्यामुळे रोहा तालुक्यात प्रत्येक पक्ष आपले वर्चस्व दाखवण्यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी गोविंदाचे स्पर्धा भरवताना आपल्याला दिसत आहे...गोविंदाच्या या स्पर्धेसाठी उंच उंच मानवी मनोरे रचून त्या किताबावर आपले नाव कोरण्यासाठी प्रयत्न येथील स्थानिक गोविंदापथकांचे सुरू आहे...

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्यामार्फतसुद्धा तीन बत्ती नाका रोहा याठिकाणी गोविंदा स्पर्धेचे तयारी सुरू

 राष्ट्रवादी पक्षाचे नेते तालुक्यामध्ये लाखोंची दहीहंडी आयोजन करताना दिसत असून...त्यांस तोडीस तोड  म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे तालुका अध्यक्ष समीर शेडगे हे सुद्धा स्पर्धा भरवताना आपल्याला दिसत आहेत... रोहा तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्यामार्फतसुद्धा तीन बत्ती  नाका रोहा याठिकाणी  गोविंदा स्पर्धेचे आयोजन  करण्यात येणार असल्याची तयारी सुरू आहे...

रोहा तालुकामध्ये राष्ट्रवादी पक्षाची मानाची हंडी कोण फोडेल याकडे सर्व रोहा तालुक्याचे लक्ष लागले असुन..या स्पर्धेत जास्त तयारी जय बजरंग गोविंदा पथक लांढर, जय भवानी गोविंदा पथक रोठ, देवकान्हे, धाटाव, अमडोशी या गोविंदा पथकांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post