महाराष्ट्र वेदभुमी

रेवदंड्यात अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात संपन्न.


लिबाग (ओमकार नागावकर) : 

मारुतीरायाचा रत्नजडीत, चांदीचा मुखवटा प्रतिमेस लावून हरिनाम सप्ताहाची करण्यात आली सुरूवात

अलिबाग रेवदंड्यात अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात दि. ०५ सप्टेंबर रोजी संपन्न झाला.. रामजन्म अर्थात रामनवमी, हनुमान जन्मोत्सव , नागपंचमी, कृष्णजन्म अर्थात गोकुळष्टमी व गोपाळकाला, दीपावली या काळात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह अनेक राज्यात सात दिवसाचे हे नाम सप्ताह करण्याची परंपरा जोपासली जाते... महाराष्ट्रात सर्वाधिक अखंड नाम सप्ताह हा पंढरपूर, आळंदी, देहू सारख्या ठिकाणी आयोजित केले जातात... त्याचबरोबर गावोगावी या  निमित्ताने देखील अखंड हरिनाम सप्ताह करीत असतात...असेच रेवदंडा पारनाका येथील प्रसिद्ध असलेलं ग्रामदैवत श्री मारुती मंदिर येथे मंगळवार दि.२९ ऑगस्ट रोजी मारुतीरायाचा रत्नजडीत, चांदीचा मुखवटा प्रतिमेस लावून या हरिनाम सप्ताहाची सुरूवात करण्यात आली...

हरिनाम सप्ताहाच्या उद्यापनावेळी श्री. मारुतीरायाची भव्य पालखी पारंपारिक वाद्य ढोल ताशा वाजवत संपन्न

पुढील सात दिवस संपूर्ण रेवदंड्यातील ग्रामस्थांच्यावतीने अखंडपणे कुठलेही खंड न पडता दिवस रात्र भजन करत सप्ताह करण्यात येतो... भजन मंडळाला भजनासाठी दोन तासांचा अवधी दिला जातो... त्या भजन मंडळाचा अवधी संपताच, खंड न पडू देता दुसरे भजन मंडळ आपले भजन करण्यास सुरुवात करतात...असे अनेक वर्षांपासून रेवदंडा गावात ही परंपरा सुरु असून, या सप्ताहादरम्यान गावातील वातावरण भक्तीमय होत असते...या उत्सवात गावातली महिलावर्ग देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात...महिलांच्या प्रहराला स्वतः भजन करत, भक्तीत तल्लीन होवून भजनाचा मनमुराद आनंद घेतात...तर शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दि.५ रोजी हरिनाम सप्ताहाच्या उद्यापनावेळी श्री. मारुतीरायची भव्य पालखी पारंपारिक वाद्य ढोल ताशा वाजवत काढण्यात आली...

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या सौ. मानसी महेंद्र दळवी उपस्थित 

पालखीची मिरवणूक संपूर्ण गावात फिरवीण्यात येत असून सर्व भाविक पारंपारिक पद्धतीने प्रत्येक देवळात पालखी थांबवून तर ग्रामथांकडून पालखीची आरती व पूजा करून भक्तीमय वातावरणात व हरिनामाच्या गजरात हा पालखी सोहळा पार पाडण्यात येतो...पालखीची समाप्ती श्री. मारुती मंदिर येथे महाआरती करून करण्यात येते...यावेळी संपुर्ण रेवदंडा गावातील ग्रामस्थ महाआरतीसाठी उपस्थित असतात. यावर्षी श्री हरिनाम सप्ताहाच्या पालखीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या सौ. मानसी महेंद्र दळवी या देखील उपस्थित  होत्या, तसेच कमिटी अध्यक्ष किशोर दांडेकर, सचिव नंदकुमार झावरे, खजिनदार नारायण शर्मा, सदस्य आशिष भट, सदस्य शरद गोंधळी, सदस्य कुमार तांबडकर, सदस्य प्रभाकर लोहार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post