कोलाड प्रतिनिधी:(श्याम लोखंडे)
शिवभक्तांची गड चढत असताना मार्ग चुकण्याची अडचण लक्षात घेऊन गडावरील मार्गात लावण्यात आले दिशा दर्शक फलक
दुर्गसंवर्धनाचा घेतलेला वसा पेलण्याची ताकद बहाल करण्यास शिवछञपतींचा जयघोष पुरेसा ठरतो याची प्रचिती स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचे कार्य पाहिल्यास तत्काळ येते गडावर येणाऱ्या पर्यटकांची आणि शिवभक्तांची गड चढत असताना मार्ग चुकण्याची अडचण लक्षात घेऊन येथील स्थानिक संस्थेच्या माध्यमातून गडावरील मार्गात दिशा दर्शक फलक लावण्यात आल्याने या संस्थेचे तसेच गड संवर्धन मावळ्यांचे गड प्रेमी तसेच पर्यटकांकडून कौतुक केले जात आहे...स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेने केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे येणाऱ्या गडप्रेमींना तसेच पर्यटांनाही गडाचा मार्ग सापडण्यास सुकर होणार आहे... त्याचबरोबर महामार्गावरील थांब्यावर आणि गडाच्या मध्यवर्ती ठिकाणी गडावरील ठिकाणांचे स्थळदर्शक फलक तसेच त्याबाबतची थोडक्यात माहिती संस्थेच्या माध्यमातून लावण्यात आले की जेणेकरून येणाऱ्या शिवभक्तांना आणि इतिहास प्रेमींना स्थळदर्शन घेण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अथवा त्या स्थळांची माहिती लक्षात येईल..
मुंबई गोवा महामार्ग खांब नाका ते वैजेनाथ मार्गासह गडावर स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची २२ वी मोहीम
गडावर येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित तसेच अचूक मार्ग स्थळ म्हणून मुंबई गोवा महामार्ग खांब नाका ते वैजेनाथ मर्गासह गडावर स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची ही २२ वी मोहीम रविवारी ३ सप्टेंबर रोजी मार्ग क्रमन दिशादर्शक फलक लावले मोठया उत्साह वातावरणात तसेच सर्व स्थानिक सुरगड मावळ्यांच्या मदतीने पुर्णत्चास गेली असून या मोहिमेत तब्बल २९ सुरगडाच्या शिलेदारांनी सहभाग नोंदवला. संस्थेच्या सदस्यांची गडाप्रती असलेली निष्ठा संवर्धन कार्यातून अधोरेखीत होते. नित्य नियमाने त्याचबरोबर मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांचे गडसंवर्धनाचे कार्य अविरतपणे चालू आहे.
प्रतिक्रिया
निश्चितच ऐतिहासिक शिवकाळातील असलेला खांब वैजेनाथ माथ्यावरील सुरगड हा वेगळा असेल परंतू येणाऱ्या पिढीला या गडाचं अस्तित्व आम्ही स्थानिक गड प्रेमी म्हणुन टिकवून ठेवण्याचं कार्य अविरतपणे करू आणि येणाऱ्या कित्तेक पिढ्यांकडे हे गडसंवर्धनाचं कार्य सुपूर्द करू. पुढील येणाऱ्या काळात याच उत्साहात येथील गडकोटाचे संवर्धन हे अखंड अविरत येथील गड प्रेमी तसेच युवकांच्या पुढाकाराने चालू राहणार तसेच सदारच्या मोहिमेतून लावलेले दिशादर्शक फलक हे आकर्षित असल्याने गडावर येणाऱ्या पर्यटकांची अधिक पसंती ही कायमच सुरगड सर करण्यासाठी राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अजय भोसले यांनी दिली...

