महाराष्ट्र वेदभुमी

रोहयात नेत्रतपासणी शिबिरात १३५ जणांची तपासणी तर ६५ मोतीबिंदू रुग्णांचे ऑपरेशन




कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे 

१३५ रुग्णांची तपासणी ... त्यापैकी ६५ रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल 

रोहा, दि. ०४ सप्टें. प्रतिनिधी :-रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली... त्यापैकी ६५ रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले...रोहा सिटिझन फोरमने गेल्या वर्षभरात ७०० नेत्ररुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे...

श्री धावीर महाराजांच्या मंदिर सभागृहात झालेल्या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 

रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले...रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या मंदीर सभागृहात झालेल्या या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले...शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ केरवी, डॉ अश्विनी पाटील, सायली उतेकर, नंदिनी देवघरकर, अमर पोकळे, रामदास पवार आदींनी रुग्णांची तपासणी केली...रोहा सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक अप्पा देशमुख, मिलिंद अष्टिवकर, श्रीकांत ओक, इल्यास डबीर, दिनेश जाधव, प्रशांत देशमुख, परशूराम चव्हाण, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, शैलेश रावकर, राजेश काफरे, सिद्देश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, रिद्धी बोथरे, भावेश अग्रवाल, बिलाल मोर्बेकर आदी फोरम च्या सर्व सदस्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली...रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post