कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे
राज्यभर मराठा समाजाचे आंदोलन चालु आहे...त्यांना ओबीसीमधुन आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे...त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही...ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावे...परंतु आरक्षणाच्या न्यायी हक्कावर गदा येत असेल तर आम्ही सहन करणार नाही असे ओबीसी जनमोर्चाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांनी सांगितले...यावेळी महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अक्षरा कदम, रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे, अनंत खराडे, मोरेश्वर खरीवले, चंद्रकांत भगत, अरविंद मगर, मुकेश भोकटे आदी उपस्थित होते...
ओबीसी समाज ५२ टक्केच्यावर परंतु लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण नाही...
सुरेश मगर यांनी ओबीसी समाज ५२ टक्केच्यावर आहे...परंतु लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळत नाही...आदीच ओबीसींचे आरक्षण कमी आहे...ओबीसीमध्ये मराठा समाज समाविष्ट झाला तर आमचे आरक्षण कमी होईल...त्यामुळे आम्ही हा अन्याय कदापी सहन करणार नाही...महाराष्ट्रात ओबीसी जनमोर्चाच्यावतीने ओबीसीमध्ये जनजागृती करुन मोठे आंदोलन करु...येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आमची ताकत दाखवुन देवू...
ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची प्रमुख मागणी...आरक्षणावर गदा आल्यास रस्त्यावर उतरू
ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे...ओबीसीची जातीनिहाय जनगणना केल्यास आमची संख्या कळेल...संख्या कळल्यास संख्येनुसार आम्हाला शासनाकडून समाजाच्या विकासासाठी निधी मिळेल...परंतु ही संख्या कळल्यास सरकारला आकडेवारीची भिती वाटते...आमच्या आरक्षणावर गदा आल्यास आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, उपोषण करुच दुसरीकडे न्यायालयीन लढाई ही लढणार असल्याचे सांगितले...यावेळी ओबीसी जनमोर्चा महीला आघाडी अध्यक्षा अक्षरा कदम यांनी सरकार मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या मताला सहमत नाही... असं झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु या आंदोलनात महीला आघाडी पुढे असतील...सरकारने जातीनिहाय जनगणना करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे...ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांनी ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर हे जे आदेश देतील त्यांच्या आदेशानुसार आम्ही करणार असून ओबीसी समाज आंदोलनासाठी संघटीत करणार असे सांगितले...
