कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यातील तिसे गावात दरड कोसळून डोंगराचा काही भाग ढासळला...
रोहा तालुक्यातील तिसे गावात दरड कोसळून डोंगराचा काही भाग ढासळला...परंतु सुदैवाने कोणती जिवितहानी अथवा रहवाशी नागरिकांना धोका झाले नसल्याचे समजले परंतु मोठ मोठ्या दगड गोटे घरावर धडकल्याने त्यात चंद्रकांत मुरकर यांच्या घराला तडे गेले आहेत..तर अधिकच्या वस्तीधारक अथवा कुटुंबांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागू नये यासाठी ताबडतोब येथील घरातील कुटुंब नागरिकांना ग्रामस्थ नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे...शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी जोरदार झालेल्या पावसात सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून ग्रामस्थ नागरिकांनी येथील अकरा कुटुंबांना प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी हलविले...तर घटनेची माहिती मिळताच आ.अनिकेत तटकरे,कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे,स्थानिक प्रशासन रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीदार देशमुख,गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे ,मंडल अधिकारी गुंड,तलाठी केंद्रे, तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना दिलास देत सुरक्षेतेची माहिती दिली...
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधून योग्य खबरदारी घेण्याच्या दिल्या सूचना
डोंगराचा काहीसा भाग जोरदार झालेल्या पावसात अचानक ढासळल्याने एकच खळबळ उडाली... रायगड जिल्ह्यात महाड येथिल तलीये, नंतर इरसालवाडीच्या घटनेमुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते...तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना धीर दिला... जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधून योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या त्याच धर्तीवर आपत्कालीन व्यवस्थापन अधिक काम करत आहे...मात्र रोहा तालुक्यातील ही काही गावे डोंगर भागात तसेच पायथ्याशी आहेत तर या गावांचा स्थलांतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे...
प्रतिक्रया
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण अधिकारी हे शनिवारी येथे भूशास्त्रीय सर्वेक्षण करणार असून अहवाल सादर करतील. तूर्तास खबरदारीचा उपाय म्हणून येथील २० कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी गावातच हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांसोबत पुढील चर्चा करुन विश्वासात घेत स्थलांतराबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल...आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले..
