महाराष्ट्र वेदभुमी

मुरुड तालुक्यातील रा जि प शाळा चोरढे मराठी येथे विद्यार्थी शिक्षक दिन साजरा ।



प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा 

रा जि प शाळा चोरढे मराठी येथे विद्यार्थी शिक्षक दिन साजरा

 दि. ८ सप्टें. २०२३ रोजी रा जि प शाळा चोरढे  मराठी येथे विद्यार्थी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सातवीच्या विद्यार्थ्यांनी  पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. मराठी , गणित , इंग्रजी , कला विज्ञान या विषयांचे अध्यापन करण्यात आले.... सकाळी परिपाठाने उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.... कुमारी आर्या सुभेदार आज शाळेचे मुख्याध्यापिका झाली... निपुण भारत गीत ढोलकी  वाजवून घेण्यात आले... विद्यार्थ्यांनी शिकवताना शैक्षणिक  साहित्यांचा अधिकाधिक वापर केला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता भगत, उपशिक्षक  राजेंद्र नाईक,रमेश सुभेदार , प्रतिभा वर्तक यांनी विशेष मेहनत घेतली. सकाळी साडेदहा वाजता परिपाठाने उपक्रमाला सुरुवात होऊन विद्यार्थ्यांनी पाच तासिकांचे अध्यापन केले... 


शिबिरात साधारणतः ७० ते ८० पालक दरवर्षी होतात सहभागी 

मानवी घाग, मयंक तांबडे , खुशी भोईर , आदर्श घाग, अनुज घाग, श्रुती महाडिक , दक्ष भोईर , देवांश चोरढेकर , अब्दुल कोदारे , हर्दिक महाडिक , चरण घाग , सुहान काजारे , देवांश चोरढेकर, यश शेडगे , मानवी घाग इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना अतिशय आनंद वाटला.चोरढे  मराठी शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. रक्षाबंधन , नारळ , होळी , स्पर्धा प्रश्नमंजुषा, सहल, परिसर सहल , वृक्षारोपण , रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम घेतले जातात. गेल्या वर्षी मुरुड तालुका विज्ञान प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांचा निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रश्नमंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक, शिक्षक विज्ञान प्रतिकृतीत तृतीय क्रमांक इत्यादी पारितोषिके प्राप्त केली. दरवर्षी शाळेमध्ये पालकांचे श्रमदान शिबिर आयोजित केले जाते. श्रमदान शिबिरात  साधारणतः ७० ते ८० पालक दरवर्षी सहभागी होतात.

Post a Comment

Previous Post Next Post