कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
सदरचा गुन्हा हा विजय शेट्टी याने केला असून... पुष्ठी देणारे पुरावे सदर ठिकाणी मिळुन आलेले आहेत.
दिनांक २१.ऑगस्ट.२०२३ रोजी दुपारी १:३० ते २:३० वाजण्याचे दरम्यान कोकण रेल्वेचे कर्मचारी गेटमन चंद्रकांत सटु कांबळे वय ५३ वर्षे रा.पाले बु.ता.रोहा जि. रायगड यांची कोकण रेल्वे रोहा कोलाड रेल्वे मार्गावर गेट क्रमांक चार तिसे रेल्वे गेट येथे कर्तव्यावर असताना कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यामध्ये गोळी घालुन कांबळे यांची हत्या केली होती...सदर घटनेबाबत कोलाड पोलीस ठाणे गु. र. क्र. 83/2023 भा.दं.सं कलम 302 सह शस्त्र अधीचे कलम 3, 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला... गुन्हयाचे घटनास्थळाचे अंगुलीमुद्रा तज्ञ, फॉरेन्सीक व्हॅन नवी मुंबई, डॉग स्कॉड, बि.डी.डी.एस. पथक यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले..सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मा.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले..त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि / नागेश कदम, पोसई/ धनाजी साठे पोसई/विकास चव्हाण पोसई/विशाल शिर्के व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील २२ पोलीस अंमलदार अशी पथके तयार करण्यात आली... नमूद पथकांनी तांत्रिक तपास तसेच मयताला गोळी मारून ठार मारण्याचे उद्देश याबाबत वेगवेगळ्या कोनातून सखोल तपास केला... या तपासात असे आढळून आले की, मयत चंद्रकांत सटु कांबळे यांची बहिण विमल शेट्टी हिचे व तिचे पती विजय रमेश शेट्टी यांच्यात वाद असून त्या दोघांचे संयुक्त नावाने असलेले खैरवाडी येथील घर विजय शेट्टी यांना विकायचे होते..सदर घर विक्रीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता... विजय रमेश शेट्टी हा राहत असलेल्या खैरवाडी, ता. रोहा या ठिकाणचे त्याचे राहते घराचा घरझडती पंचनामा करण्यात आलेवर सदरचा गुन्हा हा विजय शेट्टी यानेच केला आहे... याला पुष्ठी देणारे पुरावे सदरठिकाणी मिळुन आलेले आहेत. आरोपी विजय शेट्टी याचेवर पनवेल शहर येथे गोळीबार करून दुहेरी हत्त्या केल्याचा गुन्हा दाखल होता...तसेच पुणे येथे मालमत्तेच्या अपहाराचा गुन्हा दाखल आहेत...
सदर गुन्ह्याचा समांतर तपास पो नि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बाळासाहेब खाडे करीत.आहेत
एकंदरीत सर्व पुराव्यानुसार विजय रमेश शेट्टी यानेच चंद्रकांत सटु कांबळे यांची गोळी घालुन हत्या केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे... सदर संशयीत इसम विजय रमेश शेट्टी याचा शोध घेवुन लवकरात लवकर त्यास अटक करीत आहोत. सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक सो, मा. श्री अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा हे तपास करीत असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बाळासाहेब खाडे हे करीत असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कडील ०४ पथके आरोपीचा कसून शोध घेवून अटक करण्याकरिता नेमले असल्याचे जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या कडून माहिती प्राप्त झाली आहे..
