महाराष्ट्र वेदभुमी

मुस्कान चौधरी बेपत्ता...बेपत्ता व्यक्ती दिसल्यास पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन..

 


उरण दि.२६ प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे) 

किरकोळ वादावरून रागाच्या भरात घराबाहेर पडलेली मुस्कान बेपत्ता...

मुस्कान नवनीत चौधरी, वय १३ वर्षे (जन्म ता २३/०७/२०११) ही मुलगी सध्या रूम - १०३, एल ६,मल्हार सोसायटी, जेएनपीटी टाउन शिप समोर उरण, जि -रायगड येथे वास्तव्य करत होती...तर मुस्कानचे मूळ गाव मसुदानपूर, ता बलीया, जि - बेगुसराय, राज्य बिहार हे आहे...मुस्कान चौधरी ही जेएनपीटी टाऊनशिप मधील आर के स्कुलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती...मुस्कान हिचे आईसोबत किरकोळ वाद झाला...व त्या रागाच्या भरात ती घराबाहेर पडली...आई वडिलांनी तीचा शोध घेतला परंतू ती मिळाली नाही...


कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा पोलिसांना संशय 

शेवटी दि १९/९/२०२३ रोजी मुस्कान नवनीत चौधरी ही मुलगी हरविल्याबाबत तीच्या आईवडीलांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली...अज्ञात इसमा विरोधात कलम ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे...मुस्कान चौधरी हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय पोलिसांना आहे...या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज कांबळे करीत आहेत...

मुस्कान नवनीत चौधरी हरविल्याबाबत उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल 

रंग सावळा, चेहरा गोल, काळे डोळे,लांब केस, अंगाने सडपातळ, उंची 4.5 फूट,अंगात जांभळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची प्लाझो पॅण्ट असे मुस्कानचे वर्णन आहे... अशा वर्णनाची मूलगी कोणाला दिसल्यास किंवा मुस्कानबाबत कोणतेही माहिती मिळाल्यास त्यांनी उरण पोलिस ठाणे फोन नंबर.०२२२७२२२३६६ (022 27222366)येथे तसेच पोलिस उपनिरीक्षक सुरज कांबळे फोन नंबर - ७६२०२४२४६०(7620242450) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post