महाराष्ट्र वेदभुमी

उरण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा



उरण दि२६ प्रतिनिधी : (विठ्ठल ममताबादे )

महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलशात माती संकलन व स्वच्छता सप्ताह साजरा 

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ५५ वा राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला...तसेच महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलशात माती संकलन व स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे...


विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करावा..व परिपूर्ण जीवन जगण्यास स्वतःस सक्षम करावे

या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन.गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करावा..व परिपूर्ण जीवन जगण्यास स्वतःला सक्षम करावे असे सांगितले...तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एच.के.जगताप कार्यक्रमात उपस्थित होते त्यांनी मेरी माटी मेरा देश या सरकारच्या उपक्रमाचा उद्देश सांगितला...


कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित 

आय.क्यु.ए.सी कॉर्डिनेटर डॉ. ए. आर. चव्हाण यांनी देशाच्या विकासात एनएसएस ची भूमिका व विद्यार्थ्यांचा सहभाग याविषयी विचार मांडले...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी योगिनी म्हात्रे (एस.वाय बि.ए) तर आभार कुमारी तनवी चौगुले (एफ.वाय.बि.ए)हिने व्यक्त केले...कार्यक्रमाचे आयोजन एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ.डी.पी.हिंगमिरे, डॉ.एम.जी लोणे, अनुपमा कांबळे यांनी केले...कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post