महाराष्ट्र वेदभुमी

रोहा : गायीने प्रसुतीस घातले चक्क सात पायाचे वासरू, वासराला पहायला उसळली एकच गर्दी.


कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

गाईन चक्क सात पाय असेलेले वासरू जन्माला घातले असल्याने परीसरात एकच खळबळ 

रायगड जिल्ह्य रोहा तालुक्यातील कोलाड खांब विभातील गोवे ग्राम पंचायत हद्दीत मौजे मुठवली बुद्रुक येथे महादेव तुकाराम सुतार या शेतकऱ्याच्या गोठ्यात त्यांच्या मालकीची असलेल्या गाईन चक्क सात पाय असेलेले वासरू जन्माला घातले असल्याने परीसरात एकच खळबळ माजली असून ऐन गौरी गणपतीच्या सणात गाईन सहा पायाच्या वासराला जन्म दिला... ही बातमी गावभर पसरताच त्याला पहावयास एकच गर्दी उसळली होती...


महादेव सुतार शेतीबरोबर कोयती,कुऱ्हाड अवजार बनवत लोहार सुतार व करतात गुरं पुशूपालन व्यवसाय

 रोहा तालुक्यातील कोलाड खांब परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत गोवे हद्दीतील मौजे मुठवली बुद्रूक येथिल शेतकरी महादेव तुकाराम सुतार हे शेती बरोबरच शेती पूरक व्यवसाय म्हणून घराच्या घरी शेतीला लागणारे अवजार म्हणून कोयती कुऱ्हाड बनवत लोहार सुतार सांभाळत गुरं पुशूपालन करत आहेत...तर ते स्वतः गुरे पालत असलेल्या गुरांमध्ये गाय ही काही महिने गाभण होती तिची प्रसूती शनिवारी सकाळी गोठ्यात झाली असून गाईन प्रसूती दरम्यान मालकाला हंबरडा फोडला तर मालक महादेव सुतार हे लगेच धाव घेत घरालगत असलेल्या गोठ्यात धाऊन गेले  असता गाभण असलेल्या घरच्या गाईन चक्क प्रसुतीच सात पायाच्या वासरला जन्म दिला...तर गाईची प्रसुतीची ही तिसरी वेळ असल्याची माहिती मालक सुतार यांनी दिली...

वासराच्या मानेच्या कण्यावर दोन बाजूला दोन तर त्याला जोडूनच एका पायाला चक्क जोड पाय 

नैसर्गिक रित्या गाय,बैल व वासराला चार पाय असतात...परंतु तालुक्यातील कोलाड खांब परिसरातील मुठवली येथे राहणारे महादेव सुतार यांच्या घरात दहा दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत...तर ऐन गौरी गणपतीच्या सणात ही एक दैवी शक्ती म्हणावी लागेल की काय?असे अनोखी सात पाय असलेले हे वासरू यांच्या गाईने तिसऱ्या प्रसूतीस दिले...तर हे वासूरू चक्क सात पायांचे असून एकदम ठणठणीत आहे...तर चार पाय हे नेहमी प्रमाणेच नैसर्गीक आहेत...तर वासराच्या मानेच्या कण्यावर दोन बाजूला दोन पाय तर त्याला जोडूनच एका पायाला जोड पाय असून चक्क या वासराला सात पाय असल्याची घटना समोर आले आहे...


सदरच्या गाईची नैसर्गिक प्रसूती झाली असल्याने तसेच चक्क सात पायाचा नर जातीचा वासराचा जन्म झाला असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच महादेव सुतार यांच्या गोठ्यात या वासराला व गाईला पाहण्यास गर्दी केली...

Post a Comment

Previous Post Next Post