महाराष्ट्र वेदभुमी

रोहा ; विसर्जनात धो-धो पाऊस! ९०६ बाप्पांसह २७५ गौराईंना भावपुर्ण निरोप!

 


 रोहा दि. २३ सप्टें.विशेष प्रतिनिधी :

रोहा तालुक्यात गौरी गणपतींच्या ९०६ बाप्पांसह आणि २७५ गौराईंचे भावपुर्ण वातावरणात विसर्जन 

गणेश आगमनापासून सक्रिय असलेल्या अविश्रांत आणि धो- धो कोसळणाऱ्या पावसात तितक्याच भावपुर्ण वातावरणात रोहा तालुक्यात गौरी गणपतींच्या ९०६ बाप्पांसह आणि २७५ गौराईंचे भावपुर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले... पावसामुळे भक्तगणांचा थोडा हिरमोड झाला असला तरीही ढोल, ताशांच्या आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तगणांनी आवडत्या बाप्पाला निरोप दिला...यावेळी शहरातील विसर्जन स्थळांवार मोठी गर्दी झाली होती...

रोहयाचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनीही विसर्जन स्थळांना भेट देऊन केली पाहणी

गणपती विसर्जनासाठी नगरपालिके तर्फे विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती... रोहा शहरातील दमखाडी घाट ,बंदर पकटी घाट, अष्टमी घाट व फरशी घाट अशी ४ प्रमुख विसर्जन घाटांची स्वच्छता करण्यात आली होती...दुपारनंतर वाजत गाजत, गुलाल उधळत, लेझिम, टाळ मॄदुंग, ढोल ताशाच्या गजरात श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती...एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदी किनारी निघाले होते...तत्पुर्वी महसुल आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने दुपारी शहरातील विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त घालण्यात आली...भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत आपल्या बाप्पांचे कुंडलिका नदी किनारी भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात  विसर्जन केले...यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी रोहयाचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनीही विसर्जन स्थळांना भेट देऊन पाहणी केली...त्याचप्रमाणे चोख पोलिस बंदोबस्त ठेवले होते...रोहा तालुक्यात पाच दिवसांच्या एकूण ९०६ बाप्पां आणि २७५ गौराईंना विसर्जन करण्यात आले असल्याची माहीती रोहा पोलीस ठाण्याचे जयेंद्र पेढवी यांनी दिली...

Post a Comment

Previous Post Next Post