महाराष्ट्र वेदभुमी

बाल्मर लॉरी कामगारांच्या धरणे आंदोलनाला यश ! कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा बाल्मर लॉरी व्यवस्थापनाला दणका

 


उरण दि २६ प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे)

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यश 

उरण तालुक्यातील बाल्मर लॉरीतील कामगारांनी केलेल्या धरणे आंदोलनाला कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आज यश मिळाले...कंत्राटदार बदलल्यामुळे बऱ्याच दिवसांपासुन संघटनेमार्फत कामगारांना त्याच पगारावर पुर्ववत कामावर घेण्यासाठी प्रयत्न सुरु होते...परंतु नवीन कंत्राटदार १५ ऐवजी फक्त ७ कामगारांना किमान वेतणावर घेण्यास तयार होते... 

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या दणक्याने व्यवस्थापन आले वठणीवर 

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या दणक्याने व्यवस्थापन आज वठणीवर येऊन १२ कामगारांना अगोदरच्या पगारावर कामावर घेण्यास तयार झाले..तर उर्वरित ३ कामगार संदर्भात चर्चा करून मार्ग काढू असे चर्चेअंती ठरले होते...त्यामुळे कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले...मात्र महेंद्र घरत यांच्यामुळे कामगारांना न्याय मिळाल्याने सर्व कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post