कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
महाड आगाराची लालपरी खांब नजिक ठिक सकाळी ७ वाजताच्या सुमारास महामार्गावर अचानक बंद
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाड आगाराची लालपरी बस नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळेवर महाड स्थानकातून सुटणारी महाड पनवेल ही एसटी सेवा प्रवासी बस सोमवार दिनांक ११/९/२०२३रोजी सकाळी आपल्या निर्धारीत वेळेनुसार महाड बस स्थानकातून ठिक सकाळी ५:४५ मिनिटानी प्रवासी घेऊन निघाली.. मात्र कोलाड सोडून पुढे येताच खांब नजिक ठिक सकाळी ७ वाजताच्या सुमारास येऊन महामार्गावरच अचानक बंद पडल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भर रस्त्यांवर दुसऱ्या बसच्या प्रतीक्षेत एक तासाहून अधिक काळ ताटकाळत उभे राहावे लागल्याने प्रवाशांनी एकच संताप व्यक्त केला...
एसटी बसच्या अचानक वायर तुटल्याने व जळाल्याने मार्गावर बस बंद.. प्रवाशांचे प्रचंड हाल...
या विषयाची सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ महाड बस स्थानक आगारातून नेहमी प्रमाणे पहाटेची महाड पनवेल एस टी बस क्रमांक एम एच ०६ बी डब्लू ८१५४ वाहन चालक कपिल शे प्रचंड व वाहक जी डी जावीर हे नियमित आपली कामगिरी बजावत सदरच्या बस मधून प्रवासी घेऊन पनवेलकडे मार्गस्थ झाले.. ही बस पहाटेची असल्याने सदरच्या बसमधून असंख्ये प्रवासी घेऊन निघाली तर शाळेतील ,महाविद्यालयातील विद्यार्थी, कामगार, तसेच काही प्रवासी बसमधून प्रवास करीत होते.. परंतु ही बस अचानक कोलाड सोडून पुढे येताच खांब नजिक सदरच्या एसटी बसच्या अचानक वायर तुटल्याने व जळाल्याने मार्गावर बंद पडल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
प्रतिक्रया
महाड येथून प्रवाशी घेऊन वेळेवर निघालो महाड ,लोणेरे,माणगाव, इंदापूर,कोलाड या ठिकाणचे काही प्रवाशी उतरले नवीन चढले कोलाड येथून बस पुढे आली आणि अचानक बंद पडली...बस पुन्हा सुरु होत नसल्याने ती चेक करत असतात काही वायर जाळून आल्याच्या आढळून आल्याने बस रस्त्याकडेला उभी करून वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहकानी त्यांना जी मिळेल त्या बसमध्ये पाठवण्याचे काम तातडीने केले... कपिल शे प्रचंड बस चालक
प्रतिक्रया
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडलाच्या गलथान कारभारावर प्रवाशी वर्गात एकच संताप व्यक्त केला जात असून अशा या गलथान कारभाराला जबादार कोण तसेच मुंबई गोवा महमार्गाचे रखडलेले काम हेच वाहन चालक तसेच वाहनांना त्रास दायक ठरून चांगली चांगली वाहने ही रस्त्यावरच बंद पडल्याने प्रवाशांवर मोठे संकट उभे राहत आहे काही दिवसांवर कोकण वाशियांचा गौरी गणपतीचा उत्सव आला आहे..तर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रताप त्यामुळे ही संकट नागरिकांवर ओढवली जात आहेत त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात या मार्गाच्या खड्ड्यांवर उपाय योजना करण्यात याव्या अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.... चंद्रकांत सावंत.
