महाराष्ट्र वेदभुमी

हिंदुजननायक सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन भुनेश्वर गावातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात मनसेमध्ये जाहीर प्रवेश



अनंत म्हसकर (प्रतिनिधी धाटाव रोहा)

दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोलजी पेणकर यांच्या मार्गदर्शनानुसार तरुण पिढीचा मनसेमध्ये प्रवेश...

आज दिनांक ११ सप्टेंबर, २०२३ रोजी भुवनेश्वर येथे असंख्य सक्रिय तरुणांचा जाहीर प्रवेश हिंदूजननायक राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच सध्याच्या चाललेल्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून दक्षिण रायगड जिल्हा सचिव श्री अमोल जी पेणकर यांच्या मार्गदर्शनानुसार रोहा तालुक्यातील धाटाव विभागातील भुनेश्वर गावातील तरुण पिढीचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश...

भविष्यात मनसे हाच एकमेव पक्ष राजकारणात करणार उत्तम कामगिरी... जनतेचा ओढा पक्षाकडे वाढला

सर्व नवीन कार्यकर्त्यां ह्या मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यासाठी दक्षिण रायगड जिल्हा सचिव श्री अमोल जी पेणकर, रोहा तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे, धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, उपतालुका अध्यक्ष सुरज मुटके, रोहा शहर अध्यक्ष अमित पवार, तसेच अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.भूनेश्वर गावातून कु योगेश घाडगे, विघ्नेश म्हसकर, साहिल म्हसकर आदी असंख्य कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला...

Post a Comment

Previous Post Next Post