महाराष्ट्र वेदभुमी

स्वच्छता पंधरावडानिमित्त लेख



माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर :

मनुष्यच नाही तर प्राणी,पक्षी, झाडे,वेलीसुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही 

द्वेष, भांडण,राग आपल्याला आंघोळीबरोबर विसर्जित करता आलं तर किती छान 

चराचरातील प्रत्येकाला हवी असणारी गोष्ट.. हो ! हो!अगदी सर्वचजण यासाठी आग्रही असतात...पण कोण स्वत:करतो..तर कोण करून घेतो...किंवा कोणी दुसरे करेल म्हणून काही तर जण वाट बघत असतात...मनुष्यच नाही तर प्राणी,पक्षी, झाडे,वेलीसुद्धा या स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही असतात...आपण घरात रहातो त्यामुळेच आपल्याला आपली,स्वत:ची,घराची आणि आजुबाजुच्या परिसराची स्वच्छता करावीच लागते...

स्वच्छता ही तर प्रसन्न वातावरणाची, दीर्घायुष्याची,आनंदी जीवन जगण्याची एक किल्लीच आहे...आपण स्वतःपासून रोज सकाळी, उठून दात घासणे, प्रातःविधी करणे, आंघोळ करणे म्हणजे आतून, बाहेरून स्वतःला सुर्योदयालाच दिवसाच्या सुरवातीला स्वतःला नव्याने तयार करणे...हे अगदी सगळ्यांकडेच सहजपणे होत असते...स्वच्छ कपडे हवेच...पण त्याचबरोबर स्वच्छ मन ही हवेच...मग स्वच्छ मनाची सवय होणे हे तर खूप गरजेच आहेच ना? मग द्वेष, भांडण,राग आपल्याला आंघोळीबरोबर विसर्जित करता आलं तर किती छान होईल ना? खरं तर त्याचीच गरज आपल्याला जास्त आहे...

पक्षी,प्राणी,झाडं हे जसे आतून बाहेरून स्वतःला स्वच्छ करून निर्मळ होतात...पक्षी तर सकाळीच स्वतःचे पंख स्वच्छ करून स्वच्छंदीपणे उंच आकाशात विश्वासाची रोज नव्याने झेप घेतात...अगदी सहज.... प्राणी...हो प्राणी ते सुद्धा....आपलं अंग स्वच्छ करू घेतात... झाडे, वेली...त्यासुद्धा जूनी झालेली पानं गाळून पाडतातच ना...आणि आणि पुन्हा नव्याने पालवी फोडून नवीन पानांचे स्वागत करतात...आणि निसर्गात बहरून जातात...

परंतु जी आपल्याला स्वच्छतेची भासणारी गरज त्याचं मूळ काय....? आणि पुढे न्यायचं तरी काय...? ... खरं तर आपण आपला परिसर..आपले शरीर...स्वतःहून स्वच्छ केले पाहीजे...ती आपली शरीर संपत्ती आहे..तशीच जबाबदारीसुद्धा आहे...आपण निसर्गातून पुढे जाण्याचा हा स्वच्छतेचा धडा सर्वप्रथम शिकलाच पाहिजे...ती म्हणजे शरीर आणि मनाची  स्वच्छता...कारण..कारण तिच दाखवते पुढे पुढे जाणारा मार्ग आणि देते आपल्या सगळ्यांना यशाचा, समृद्धीचा रस्ता...आणि घडतो तो बदल !!

शब्दांकन: अनन्या अमोल कुळकर्णी इंदापूर-माणगाव-रायगड

Post a Comment

Previous Post Next Post