महाराष्ट्र वेदभुमी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारी पंचायत म्हणजेच यशवंत ग्रामपंचायत धाटाव



रोहा धाटाव प्रतिनिधी ( अनंत म्हसकर)

स्वच्छता अभियान सन्मानपत्र प्राप्त केलेली एक नामवंत ग्रामपंचायत धाटाव कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ हैरान*

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारी पंचायत म्हणजेच यशवंत ग्रामपंचायत धाटाव ओळखली जाणारी तसेच स्वच्छता अभियान सन्मानपत्र प्राप्त केलेली एक नामवंत पंचायत असली तरी सध्या मात्र याठिकाणी कचऱ्याचा ढीग असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडला कंपाऊंड असूनही त्याच्या आत कचरा न टाकता बाहेर मुद्दामहून कचरा टाकला जात आहे..मात्र याठिकाणाहून  येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना या दुर्गंधीचा त्रास  सहन करावा लागत आहे...हा दुर्गंधीचा त्रास सहन होत नसल्याने येथिल नागरिक  तोंडावर हात रुमाल ठेवून जातात.. अशा या अत्यंत कुजलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अनेक रोग राईला आमंत्रण देत सामोरे जावे लागत आहे...तसेच गुरांना येथे रोजच्या रोज टाकलेला हा कचरा खाण्यासाठी मिळतो...त्यामुळे सकाळी सोडलेली आसपासची सर्व गुरे धावतच याठिकाणी हा  टाकलेला कचरा खाण्यासाठी येतात... परंतु काचा,धारदार.वस्तू प्लास्टिक पिशव्या व इतर बाधित पदार्थ खाऊन गुरे आजारी पडून मृत्युमुखी पडत आहेत...असे असूनही मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे..



लाखो रुपये खर्च करून राबविले जाणारे स्वच्छता अभियान फक्त पारितोषिक मिळण्यापुरताच का?

पशुपालन,गाई, म्हशी पालन यासाठी शासन योजना राबवत आहे...आणि पशुपालन हा शासनाचा निर्णय असून शासन स्वच्छता अभियानावर लाखो करोडो रुपये स्वच्छतेसाठी खर्च करत आहे... मात्र असे असताना पंचायतीमधील कचऱ्याची ही अवस्था भयानक आहे..लाखो रुपये खर्च करून राबविले जाणारे स्वच्छता अभियान फक्त पारितोषिक मिळण्यापुरताच आहे का?आणि जर असे असेल तर मग आपण स्वच्छता अभियान काय राबवतो? या दूषित वातावरणाला व दुर्गंधीच्या त्रासाला जिम्मेदार कोण? असा प्रश्न याठिकाणंच्या ग्रामस्थांना सतावत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post