महाराष्ट्र वेदभुमी

एक मार्गिकेचे काम कधी पूर्ण होईल पावसाचा खोळंबा, खड्ड्यांचे साम्राज्य, धुळीने जीव गुदमरतोय,खांब, कोलाड ग्रामस्थांचा संताप.




कोलाड प्रतिनिधी: (श्याम लोखंडे)

पाऊस खोळंबल्याने मुंबई गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य 

मुंबई गोवा महामार्गाला लागलेली साडेसाती दिवसेंदिवस वाढतच आहे...खड्ड्यात रस्ते,की रस्त्यात खड्डे मात्र त्या खड्ड्यांची अशी परिस्थीती निर्माण झाली असून बुजवण्यासाठी टाकलेली खडी व मातीमुळे सध्या पाऊस खोळंबल्याने मुंबई गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे... वाहन चालक व प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत... मागील काही आठ ते दहा दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने खांब कोलाड आंबेवाडी नाक्यावर वाहतुकीमुळे हवेत प्रदूषित होत नागरिकांचा जीव  प्रदूषित  धुळीच्या कोंडीमुळे अक्षशः गुदमरत असल्याने येथील समस्त नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे...

वाहन चालकांना खड्यांमुळे अक्षरशः तारेवरची कसरत धूळ नाक, तोंड व घशामद्ये जाऊन आजाराला बळी

मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट म्हणजे अक्षरशः चाळण झाली आहे... खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याकरिता खडी व मातीचा वापर केला आहे... नागोठणे , वाकण,सुकेळी, खांब,कोलाड, वरसगाव इंदापूर दरम्यान या मार्गावरील अवजड वाहनांमुळे खड्ड्यातील खडी व रेती बाजूला होऊन धुळ उडून हवेमध्ये धुळीचे साम्राज्य पसरल्याने समोरील गाडीसुध्दा वाहन चालकाना दिसत नसल्याने खड्डे भरण्याकरिता वापरण्यात आलेल्या रेती, खडीवरून मोटारसायकल घसरून अपघाताचे प्रमाण वाढलेय ...खड्यांच्या त्रासाबरोबर मार्गालगत असलेली घरे,बाजारेठ ,तसेच वाहन चालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे... सुकेळी ते तीसे दरम्यान पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते.. मात्र त्यापाठोपाठ धूळदेखील नाक, तोंड व घशामद्ये  जाऊन आजाराला सामोरे जावे लागत असल्याचा संताप वाहन चालक व प्रवाशी वर्गातून केला जात आहे...

प्रतिक्रया 

मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली सतरा वर्ष रखडले आहे तर या मार्गाची राज्यासह देशात तसेच जगभरात बोंब सुरू आहे तर किती सरकारं आली आणि गेली त्यात ठेकेदार ही दर वेळेला बदलले कोटयावधी रूपये खर्च झाले मात्र मार्ग काही होईना?कोकण वाशीयांचा प्रवास काय सुखरकर होईना?जून मध्ये उशिराने पाऊस सुरू झाला...तर पहिल्याच पावसात महामार्गाची दुरवस्था झाली...बांधकाम मंत्री महोदय फक्त पाहणी करून जातात... गणपतीपर्यंत एका मार्गिकेचे काम पूर्ण होईल असे आश्वासन देतात...त्यामुळे एका मार्गीकेचे कासू पासून इंदापूर दरम्यानचे सुरू केलेले काम कोणत्या टप्प्यात पूर्ण होईल याकडे लक्ष लागले आहे..

प्रतिक्रया 

एक तप पूर्ण होऊन गेला एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतरही हा राष्ट्रीयमहामार्ग तयार होत नाही कित्येक बळी या मार्गावरील अपघातात गेले... आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली खरी मात्र भयानक पडलेले खड्डे तसेच वाहनांच्या वर्दलीमुळे हवेत प्रदुषित होत असलेली खडी माती मिश्रितील धुळीमुळे नागरिकांच्या घशा तोंडात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय मार्ग म्हणुन संपुर्ण जगभरत याची ओळख आहे...त्यामुळे  रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात यावी...अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच पर्यावरण प्रेमी डॉ मंगेश सानप यांनी करत आपला संताप व्यक्त केला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post