उरण प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे )
मुंबई सानपाडा सिडको जमिनीचा विक्री बाजारभाव प्रती गुंठा रु ५कोटी,परंतु जमीन खरेदी करताना घोर फसवणूक
दिनांक ३१ नवी मुंबई सानपाडा येथील सिडको जमिनीचा विक्रीचा बाजारभाव प्रती गुंठा ५ कोटी रुपये आहे...म्हणूनच नवी मुंबई लगतच्या असलेल्या उरण, पेण, पनवेल येथील जमीनीलासुध्दा ५ कोटी प्रति गुंठाप्रमाणे भाव आहे... या भावाने आमच्या जमीनीची किंमत ही १०० कोटीहुन जास्त आहे...परंतु रमेश रामदुलार यादव यांनी आमची जमीन खरेदी करताना आमची घोर फसवणूक केली आहे...तरी त्याच्यावर पोलिस इडी चौकशी करुन आम्हांला योग्य तो न्याय द्यावा...अशी मागणी उरण, पेण, पनवेल तालुक्यातील फसवणूक झालेल्या मंदा अमृत गुजर (वडाळा)चंद्रकात तुकाराम माळी (पनवेल)वैभव कृष्णा पाटील (पनवेल)वृषाली राजेंद्र पाटील(पनवेल)राजाराम दत्तू ठाकूर(पेण)नारायण बाळाजी टावरी(पेण) गणेश जाना कोळी (पनवेल)लक्ष्मण गणाजी भोईर(पेण)यशवंत जाना कोळी (पनवेल)संगिता समाधान पाटील (पेण)यांनी पत्रव्यवहाराद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, पोलीस अधीक्षक रायगड, पोलीस आयुक्त नवी मुंबई, प्रांताधिकारी पनवेल,तहसीलदार पनवेल यांच्याकडे केली आहे...शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रमेश यादव याच्यावर योग्य ती कारवाई करून इडी मार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंचद्वारे पत्रव्यवहाराद्वारे करण्यात आली आहे...
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने भुमाफिया विरोधी शेतकरी मंचची स्थापना
भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंचचे सल्लागार -राजाराम पाटील,अध्यक्ष वृषाली पाटील,उपाध्यक्ष संगीता पाटील,सचिव वैभव पाटील,सहसचिव हिरामण ठाकूर,खजिनदार सतिश भोईर,सहखजिनदार चंद्रकांत माळी,सदस्य -लक्ष्मण भोईर,भोलानाथ टावरी,मंदा गुजर,योगेश कोळी,शेषमणी पांडे,प्रमोद मल्ल,यशवंत कोळी,राजाराम ठाकूर यांनी उरण पनवेल पेण तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंचची स्थापना केली असून ज्या ज्या शेतकऱ्यांची बिल्डर रामदुलार यादव यांनी आर्थिक फसवणूक केली आहे...त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याची सर्व माहिती भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंचला कळवावी...असे आवाहन भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंच तर्फे करण्यात आली आहे...