महाराष्ट्र वेदभुमी

खांब नाक्यावरील बस स्थानक नसल्याने एसटी बस थांबत नाही, प्रवाश्यांची गैरसोय,नवीन बस स्थानक उभारण्याची मागणी.





 कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे )

खांब नाक्यावर नवीन बस स्थानक उभारण्याची प्रवाशी वर्गाकडून मागणी ...

मुंबई-गोवा महामार्गांवरील खांब नाक्यावरील अनेक वर्षांपासून बस स्थानक होते...परंतु मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरी करण्यात हे बस स्थानक जमीन दोस्त करण्यात आले... परंतु याला १७ वर्षे झाली तरी त्याच्या जागी अदयापही नवीन बस स्थानक बांधण्यात आले नाही... यामुळे प्रवाशी वर्गाची गैरसोय झाली असल्यामुळे खांब नाक्यावर नवीन बस स्थानक उभारण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे...

मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब नाक्यावर बस स्थानक गायब 

मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब नाक्यावर गेली अनेक वर्षांपासून बस स्थानक जणू गायब झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे...यामुळे येथे बस स्थानक नसल्यमुळे महामंडळाच्या लांब पल्याच्या एसटी बसेस थांबणे सोडाच तर रायगड मधील एसटी बसेस थांबत नसल्याने खांबकडून कोलाड कडे तसेच खांबकडून नागोठणे,पाली कडे जाणारे कॉलेज व उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाचे मोठया प्रमाणावर आतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे...खांब नाक्यावर बाहे,देवकान्हे,धानकान्हे,चिल्हे,तळवली,नडवली,खांब,वैजिनाथ,शिरवली,मुठवली,गोवे,पुगांव,मढाळी,ते बळे गारबटपर्यंत वाडया वस्त्या धरून २० ते २५ गावातील विद्यार्थी,तसेच प्रवासी नागरिक मुंबईकडे अथवा महाडकडे जाण्यासाठी येत असतात...परंतु खांब नाक्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बस स्थानक नसल्याने येथे कोणत्याही एसटी बसेस थांबत  नाही...तर एखादी मुंबईकडून येणारी बस थांबली तर तिकीट मात्र वरसगांवचा देतात...नाहीच बस थांबली तर वरसगांव वरून परत खांबकडे येण्यासाठी परत तिकीट काढावे लागत असल्याने संबंधितांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे... 

रस्त्यालगत प्रवाशांसह,रुग्णांना ऊन,पावसात तासंतास वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत रहावे लागते उभे

शिवाय अनेक वर्षांपासून बस स्थानक नसल्याने विद्यार्थी,स्थानिक नागरिक,अबालवृद्ध, प्रवाशांसह,रुग्ण यांना ऊन,पावसात तासंतास वाहनांच्या प्रतीक्षेत रस्त्यालगत ताटकळत उभे रहावे लागते...त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दुर करण्यासाठी गायब झालेला बस स्थानक बांधून येथे येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस थांबव्या यासाठी संबंधित शासन, प्रशासन, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने लक्ष देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करावी... अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे...

प्रतिक्रिया  मुंबई-गोवा हायवे वरील खांब नाका हे मध्यस्थी ठिकाण असुन येथे २० ते २५ वाडया वस्त्या असुन येथे मुंबई तसेच महाडकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसहित जेष्ठ नागरिक,महिला वर्ग, एसटीने प्रवास करण्यासाठी येत असतात परंतु येथे अनेक वर्षांपासून बसस्थानक नसल्याने लांब पल्याच्याच काय? तर रायगडमधील एसटी बस थांबत नाही यामुळे प्रवाशी वर्गाची गैरसोय निर्माण झाली आहे...तसेच मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरी करणात येथील बस स्थानक तोडण्यात आले आहे...परंतु १७ वर्षे झाली तरी येथे बस स्थानक बांधण्यात आले नाही...यामुळे प्रवाशांना उन्हपावसात रस्त्यावर उभे रहावे लागत आहे...काल रक्षाबंधन साठी निघालेल्या महिलांना तीन ते चार तास गाडयांची वाट पहावी लागली... मग एसटी बस थांबत नसल्याने महिलांना एसटी भाडयात सुट देण्याचा उपयोग काय? अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अलंकार खांडेकर यांनी व्यक्त केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post