महाराष्ट्र वेदभुमी

तांबे एज्युकेशन विद्यालयात रानभाज्यांच्या प्रदर्शनाला उत्स्फर्त प्रतिसाद,विद्यार्थ्यानी असंख्य भाज्या मांडल्या प्रदर्शनात



कोलाड प्रतिनिधी: (श्याम लोखंडे) 

माणगाव येथील विवीध ग्रामीण भाग आणि परिसरातील विविध रानभाज्यांचे प्रदर्शन

शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तांबे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलाताई पवार विद्यालय भाले तालुका माणगाव येथील विवीध ग्रामीण भाग आणि परिसरातील विविध  "रानभाज्यांचे प्रदर्शन"नुकताच शाळेत पार पडले...येथील शिक्षण घेत असलेल्या खेडोपाड्यातील विद्यार्थ्यानी शाळेतील विवीध उपक्रमांतर्गत मांडले होते...याला येथील विद्यार्थी,पालक,शिक्षक वर्गानी उत्सफूर्त प्रतिसाद दिला...

कोणत्याही मेहनतीशिवाय निसर्गतः आपोआप उगवतात त्या म्हणजे रानभाज्या

पावसाळ्यात तसेच कोकणच्या सौंदर्यात पावसाच्या पहिल्या सरी बरोबर रानोमाळी, कोणत्याही मेहनतीशिवाय निसर्गतः आपोआप उगवतात त्या म्हणजे रानभाज्या...ऑरगॅनिक फूडच्या जगात वर्षांमध्ये एकदाच उगवणारा हा मानवी जीवनाला जीवनसत्त्वातील रानमेवा म्हणजे पावसाळ्यामधील सर्वांना एक पर्वणीच ठरते...कीटकनाशके किंवा कोणत्याही मेहनती शिवाय उगवणाऱ्या या रानभाज्यांमधून आपणास विविध प्रकारची जीवनसत्वे ,खनिजे उपलब्ध होतात...जे शरीराला उपयुक्त ठरतात. विद्यालयाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात येथील विद्यार्थ्यांनी  संकलन केलेल्या विविध रानभाज्यांमध्ये भारांगा, धानंगा, करटोली, कुर्डू ,कुडा, टाकला , करंद ,कपाल फोडी, केना, गाभोली, घोळ आखूड ,चिचुरडा, सुरण, कवळा, पेवा ,पात्री ,गोमटी, गाभोळी, मसाले पान,आलू पान, तेरी,घोटवेळ ,दिंडा, तिळाचे पान,आखूड,टाकला, व इतर अशा एकूण विविध  105 प्रकारच्या रानभाज्यांचे संकलन करत त्यांचे प्रदर्शन मांडत त्यांची सखोल माहिती आणि आरोग्याला लाभदायक असलेले  फायदेदेखील प्रसंगी सांगितले...

सहाय्यक कृषी अधिकारी, तंत्रज्ञान व्यवस्थापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित

या उपक्रमाला माणगाव तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी संतोष  सुराडकर ,तसेच तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ अस्मिता संदेश चाळके ताई, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ प्रीती यादव, सदस्य दत्ताराम खांबे ,गणेश पवार,सौ सपना बाईत,सौ निर्मला सांगले, भीम धाडवे जयंत शिंदे, भाले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिनगारे सर ,सहायक शिक्षक चव्हाण सर, बापट सर ,कुडली हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक नरेश महाडिक सर , सहाय्यक शिक्षिका सौ.मेने मॅडम तसेच विविध भाले_पहूर ग्रामस्थ, पालक वर्ग, महिला वर्ग ,आदी शाळेतील सर्व विद्यार्थी, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.कळमकर मॅडम ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...

रानभाज्यांकडे ग्राहक म्हणून न पाहता संवर्धन करणे काळाची गरज

कार्यक्रमाला शैक्षणीक,सामाजिक,राजकीय,कला,क्रीडा,तसेच विविध क्षेत्रातील भेट देणाऱ्या मान्यवरांनी या नावीन्यपूर्ण राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत सर्व विद्यार्थ्यांचे -शिक्षकांचे तोंडभरून कौतुक केले...आजच्या काळात रानभाज्यांकडे  ग्राहक म्हणून न पाहता त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे...असे मत मान्यवर मंडळीकडून व्यक्त करण्यात आले..

Post a Comment

Previous Post Next Post