महाराष्ट्र वेदभुमी

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घन:श्याम कडू यांची फेरनिवड


उरण प्रतिनिधी :(विठ्ठल ममताबादे )

अध्यक्षपदी घनश्याम कडू यांची फेरनिवड आणि पत्रकार संघाचा ३७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

दिनांक १८ उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घन:श्याम दामोदर कडू यांची फेरनिवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला... अध्यक्षपदी घनश्याम कडू यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे... यावेळी पत्रकार संघाचा ३७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला...

जेष्ठ पत्रकार हसमुख भिंडे यांच्या अध्यक्षतेखाली 

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचा ३७ वा वर्धापन दिन पत्रकार संघाच्या कार्यालयात जेष्ठ पत्रकार हसमुख भिंडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला... यावेळी अहवालाचे वाचन करून त्याला सर्वानुमते संमती देण्यात आली... त्यानंतर मान्यवरांच्या निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली... यावेळी पत्रकार संघाला मदत करणाऱ्यांचे व विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले...

कार्याची दखल घेऊन कार्यकारणीने पुन्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्याचा घेतला निर्णय

त्यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन कार्यकारणीने पुन्हा त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला... पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घन:श्याम कडू यांची फेरनिवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...सदर बैठकीस पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संजय गायकवाड, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, चिटणीस रा. ऊ. म्हात्रे, सदस्य पंकज ठाकूर, महेश गायकवाड, सुयोग गायकवाड, पूजा चव्हाण आदी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post