महाराष्ट्र वेदभुमी

माजी आमदार, जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांचा शिक्षणासाठी एक हात मदतीचा.



उरण प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे ) 

गरीब विद्यार्थिनी कु.सायली सारंग व कु. परी चिर्लेकर यांच्या शिक्षणासाठी केली आर्थिक मदत

दिनांक १८ : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख, माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वानाच माहीत आहे... त्याचा आणखी एक प्रत्यय आज पहायला मिळाला... उरण मतदार संघातील उरण तालुक्यातील चिरनेर येथील गरीब व गरजू विद्यार्थिनी कु. सायली वीरेंद्र सारंग हे वीर वाजेकर कॉलेज, फुंडे येथे एफ वाय बी ए या वर्गात शिकत आहे... व कु.परी रवींद्र चिर्लेकर ही विद्यार्थिनी रोटरी क्लब एज्युकेशन कॉलेज,उरण येथे अकरावीला शिकत आहे.. त्यांच्या घरची अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांची शिक्षणासाठी फी ची व्यवस्था होत नव्हती... अशा वेळी गरीब व गरजूंच्या मदतीला नेहमीच धावून येणारे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी या विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी एक हात मदतीचा पुढे केलेला आहे...

सामाजिक बांधिलकी जपणारा नेता माजी आ मनोहरशेठ भोईर 

त्यांची फी रोख रकमेच्या स्वरूपात त्यांच्या व त्यांच्या आईकडे सुपूर्द केली..,  त्यांच्या अनमोल कार्याबद्दल सर्व स्तरावरून नेहमीच माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांचे कौतुक होत असते...सामाजिक बांधिलकी जपणारा नेता अशी त्यांची  समाजामध्ये कायमस्वरूपी ओळख निर्माण झाली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post