कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
माजी विद्यार्थी तथा शिवकार्य प्रतिष्ठान पुई यांच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य वस्तूंचे वाटप
रोहा तालुक्यातील पुई अंगणवाडी केंद्रात याच अंगणवाडी शाळेत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थी तथा शिवकार्य प्रतिष्ठान पुई यांच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य वस्तूंचे वाटप करण्यात आले...
अंगणवाडी सेविका प्रमीला गायकवाड यांच्याकडे केले सुपूर्त
आपण ज्या शाळेत शिक्षण घेऊन पहिला अक्षर लिहायला व वाचायला बोलायला शिकलो.. विविध क्षेत्रात काम करू शकलो याची जाणीव ठेवून पुई येथील माजी विद्यार्थी तथा शिवकार्य प्रतिष्ठान पुई यांनी अंगणवाडी शाळेला शाळेतील पोषण आहार धान्य साठवण डब्बा व घड्याळ भेट म्हणून अंगणवाडी सेविका प्रमीला गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला...यावेळी कामेश देवळेकर, करण सानप, रोहन पवार, संदेश दिसले, कौस्तुभ दळवी, ऋतिक लहाने, शुभम ठाकूर, दिनेश सानप,मनिष कुचेकर, अभिजित सावरकर, वृषभ लहाने, स्वप्नील सुतार यांच्यासह अंगणवाडीतील असंख्य विद्यार्थी अंगणवाडी सेविका, व मदतनीस उपस्थित होते...
