महाराष्ट्र वेदभुमी

देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन खैरेखुर्द एनइएस हायस्कूल,पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत आणि राजिप उर्दू शाळेत उत्साहात साजरा...


रोहा प्रतीनिधी:(शहानवाज मुकादम) 

रोहा तालुक्यातील खैरेखुर्द येथे चार ठिकाणी देशाचा ७७ वा अमृत महोत्सव साजरा 

रोहा तालुक्यातील खैरेखुर्द येथे चार ठिकाणी देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त राजिप उर्दू शाळा,एनइएस हायस्कूल,पोस्ट ऑफिस व ग्रामपंचायत कार्यालयावर स्वातंत्र्याची जाणीव मनात अधोरेखित करणारा तिरंगा हवेत फडकविण्यात आला...असे चार ठिकाणी ध्वजारोहण करुन प्रभातफेरी काडून खैरेखुर्द गावात अनोखा  अमृत महोत्सव साजरा करण्यात आला...

विद्यार्थ्यांनी उर्दू,मराठी,इंग्रजी वेगवेगळी भाषणातून दिली  आठवण

 भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विशेष म्हणजे यावेळेस आपल्या नेत्यांची आठवण पुनर्निर्देशित व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी उर्दू मराठी इंग्रजीत वेगवेगळी भाषणे दिली...श्री आसगर मुकादम यांनी सुरेली आवाजात "सारे जहॉंसे आच्छा हिंदुस्था हमारा" असे अनेक देश गीताने शहीदांची आठवण केल्याने शाळेतील विद्यार्थ्यी व उपस्थित मान्यवर ,शिक्षक यांच्या डोळ्यात अश्रू  अनावर झाले...

शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व उपस्थितांचे पुष्गुच्छ देऊन मानले आभार

उपस्थितांनी शाळेतील शिक्षकांंचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या वेळी ध्वजारोहणासाठी खैरेखुर्द गावचे ट्रस्टी अध्यक्ष श्री अब्बास मुकादम,गाव अध्यक्ष श्री.आजीम धनसे,डॉ.फइज खोत,श्री एजाज धनसे,श्री जाकीर खोत,पोलीस पाटील श्री.रउफ पित्तु, श्री रिजवान खोत,श्री हमीद गिते,सरपंच श्री मुजम्मील गिते,उपसरपंच श्री जुबैर धनसे,श्री आसलम पिततु,श्री वसीम धनसे,श्री गुलामहुसेन मुकादम,श्री नदीम धनसे,श्री इस्माईल नागावकर,श्री तौहीद मुकादम,श्री नसीम खोत, श्री मेहबूब धनसे,श्री सगीर सरखोत,श्री लुकमान मुकादम,श्रीम सातपुते पोस्ट मॅडम श्रीम शहनाज धनसे (खैरेखुर्द महिला अध्यक्ष) आदी उपस्थिताना  शाल व गुलाबांची फुले देउन सन्मान करण्यात आले...


Post a Comment

Previous Post Next Post