महाराष्ट्र वेदभुमी

रा. जि. प. शाळा पुगाव येथे स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा,अमृत महोत्सवानिमित्ताने एक लाखाहून अधिक किंमतीच्या शाळेस भेटवस्तू .


पुगाव- खांब प्रतिनिधी (नंदकुमार कळमकर ) 

पंचायतीच्या उपसरपंच सौ नीलम कळमकर यांच्या शुभ हस्ते ध्वजपूजन करून ध्वज फडकवण्यात आले ...

 रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथील रजिप शाळेत ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,मान्यवर, माजी विद्यार्थी आणि गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला... ७७ व्या स्वातंत्र दिनानिमित्त सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली... तद्नंतर शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा तथा पुगाव ग्राम पंचायतीच्या उपसरपंच सौ नीलम कळमकर  यांच्या शुभ हस्ते ध्वजपूजन करून ध्वज फडकवण्यात आले ...

क्लासरूममध्ये ४३ इंची स्मार्ट एल ई डी टिव्ही, कॉम्पुटर लॅपटॉप,ग्रीन बोर्डचे  शिक्षक वर्गाला वाटप 

१५ ऑगस्ट स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांनी मराठी , हिंदी आणि इंग्रजीतून भाषण करत देश भक्तिपर गीत गायन केले तसेच उपस्थीत माजी विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी स्वतंत्र दिनाबद्दलचे महत्व पटवून दिले.. या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बदलत्या काळातील शिक्षणासाठी इंटरनेटच्या जमान्यात डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी क्लासरूममध्ये ४३ इंची स्मार्ट एल ई डी टिव्ही, कॉम्पुटर लॅपटॉप,ग्रीन बोर्ड चे उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते शिक्षक वर्गाला वाटप करण्यात आले...

माझी सुंदर शाळा, माणुसकीची साथ " मदतीचा हाथ" संकल्पनेतून शिक्षणिक विकासासाठी आर्थिक मदत

माझी सुंदर शाळा, माणुसकीची साथ " मदतीचा हाथ" या संकल्पनेतून माझी विदयार्थी व ग्रामस्थ यांनी मराठी शाळेतील विद्यार्थ्याच्या शिक्षणिक विकासासाठी भरभरून आर्थिक मदत व भेटवस्तू स्वरूपात मदत करण्यात आली... गावातली सामजिक कार्यकर्ते नारायणराव धनवी यांच्या ७५ वर्षांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून त्यांचे चिरंजीव राजेंद्र धनवी यांनी ४३ इंची या शाळेस स्मार्ट टिव्ही भेट दिली...तसेच स्व. हरीभाऊ म्हसकर यांच्या स्मरणार्थ बबन म्हसकर यांनी डिजिटल ग्रीन बोर्ड भेट दिले तसेच आय टी क्षेत्राचे उद्योजक राहुल परमार यांनी येथील विद्यार्थ्यांचे गुणकौशल्य पाहून या शाळेस कॉम्पुटर लॅपटॉप भेट दिले...तसेच सौ प्रियंका शिंदे (ढमढेरे ) यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच या दांपत्याकडून  खाऊ व आल्पोपहार या कार्यक्रमाला देण्यात आला..त्याच बरोबर बबन म्हसकर यांच्यावतीने सालाहाबादप्रमाणे वकृत्व स्पर्धेतील तसेच दैंदिन स्व.हरीभाऊ म्हसकर ग्रंथालयातून पुस्तकांचे वाचन करतात या विद्यार्थ्यांना वाचकांना विद्यार्थी ग्रंथालयाच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले...तसेच पोलीस अधिकारी देशमुख आणि सेवा निवृत्त शिक्षक येलकर गुरुजी यांनी आर्थिक स्वरूपात भरघोस अशी मदत केली...तसेच देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सव प्रसंगी येथील माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी येथील विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर गुण मूल्यांकन प्राप्त केले आहे त्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक करत या प्रसंगी त्यांना उपस्थित मान्यवरांच्या वतीने भेटवस्तू बक्षीस वितरण करण्यात आले.उत्स्पुर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला शालेय समितीच्या अध्यक्षा व उपसरपंच सौ निलम कळमकर सरपंच सौ नेहा म्हसकर,सदस्य सौ अदिती झोळगे, अनिता खामकर, गणेश म्हसकर,राम धुपकर,बबन म्हसकर, निवृत्त शिक्षक येलकर गुरुजी,निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर एकनाथ देशमुख, डॉ विनोद गांधी, डॉ श्याम भाऊ लोखंडे,मारुती गोथम,महादेव खामकर, हरीचंद्र धामणसे,राम कळमकर, गोरखनाथ देवकर,सुरेश देशमुख, अजित देशमुख, चंद्रकांत अधिकारि, चंद्रकांत आणि आशोक झोलगे, अनंत देशमुख,निलेश म्हसकर, रमेश देशमुख,सौ मासक, शेळके,खामकर, धूपकर, केंद्र प्रमुख व तालुका पोषण आहार प्रमुख रत्नाकर कनोजे, मुख्याध्यापक निवास थले,सह शिक्षक प्रसाद साळवी, अंगणवाडी शिक्षिका सौ ऋतुजा देशमुख व शालेय मदतनीस सह आदी विद्यार्थी शिक्षक पालक माजी विद्यार्थि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post