कोलाड प्रतिनिधी: (श्याम लोखंडे)
भुवनेश्वर येथील बंद असलेल्या बंगल्यात चोरी झाल्याची घडली होती घटना
दिनांक २७/७/२०२३ रोजी रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भुवनेश्वर येथील बंद असलेल्या बंगल्यात चोरटयांनी खिडकीची ग्रिल उचकटून बंगल्यातील ३०.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो वजनाचे चांदीचे भांडे असा ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारून पलायन केले होते... त्याबात रोहा पोलीस ठाणेकडे गु.र.नं.१२४/२०२३ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरटयांविरोधात दाखल करण्यात आलेला होता.. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा रायगड अलिबाग करीत असतानाच त्यांचा छडा लावत त्यांच्या मुसक्या आवलत जेरबंद केले असल्याने सदरच्या विभागाचे रोहा शहरासह तालुक्यात कौतुक केले जात आहे...
सदर गुन्हयातील आरोपी मध्यप्रदेश येथील असल्याचे झाले निष्पन्न
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा कडील पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोशि/ईश्वर लांबोटे, यांनी केलेल्या तांत्रिक अन्वेषणावरून सदर गुन्हयातील आरोपी मध्यप्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले... पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड, बाळासाहेब खाडे, यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखालील सहायक पोलीस निरीक्षक/नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक/धनाजी साठे, पोलीस हवालदार/ अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक / विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई/ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत, अशी टिम गठीत केली. सदर टिमने मध्यप्रदेश येथील दुर्गम भागातील गेटा गांव, तांडा पोलीस ठाणे येथे जावून मध्यप्रदेश येथील गुन्हे शाखेचे एएसआय/भैरवसिंग देवडा, एएसआय/ रामसिंग गौरे पोशि/आर. बलराम, आरक्षक/प्रशांत सिंग चौहान, यांच्या मदतीने दुर्गम भागातील आरोपी १. कैलास कमरू डावर, वय-२६वर्षे, २. निहाल सिंग गोवन सिंग डावर, वय-४० वर्षे, ३. सोहबत इंदरसिंग डावर, वय-३६ वर्ष, सर्व रा. गेटा ता.कुक्षी जि.धार, राज्य मध्यप्रदेश यांना गुन्हयाचे कामी धैर्याने ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी रोहा येथे घरफोडी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली...
पुढील तपास पोउनि श्री धनाजी साठे, नेमणुक स्था. गु. शा. रायगड अलिबाग करीत आहेत
सदर आरोपीत यांना स्था. गु.शा. शाखेकडे आणून त्यांना गुन्हयाचे कामी अटक करून त्यांच्याकडून गुन्हयात गेलेला एकुण माल ३०.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो वजनाचे चांदीचे भांडे असा संपुर्ण १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करून गुन्हयाचे कामी जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री.धनाजी साठे, नेमणुक स्था. गु. शा. रायगड अलिबाग हे करीत आहेत...तरी मा.पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे, मा. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बाळासाहेब खाडे, यांचे अधिपत्याखालील सहायक पोलीस निरीक्षक/ नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक/ धनाजी साठे, पोलीस हवालदार/ अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक/विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई/ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत, सायबर विभागाचे पोना/ तुषार घरत, पोशि/ अक्षय पाटील यांनी यांनी रोहा येथील घरफोडीतील आरोपींना मध्यप्रदेश येथील गेटा गांव, तांडा पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गम भागातून ताब्यात घेवून चोरी केलेला सर्व १०० टक्के मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली असल्याची माहिती जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग यांच्याकडून प्राप्त झाली आहे...
