रोहा प्रतिनिधी शहानवाज मुकादम :
मा.अयुक्त यांच्याकडील पत्रावर राजिप ने सुनावणी घेऊन निर्णय देण्यास जाणुन बुजून दिरंगाई,
तालुक्यातील खैरेखुर्द कब्रस्तान मुरुम भराव करणे हे काम न करता बनावटी इतिवृत्त तयार करुन शासनास दाखवून व भासवून शासनाची व माझी दिशाभुल करुन फसवणूक केली आहे...सदर विषयात रोहा पोलीसांकडून जवळपास तपासपुर्ण करुन मा.गट विकास अधिकारी रोहा यांना रोहा पोलीसांकडून दोन वेळेस पत्र पाठविण्यात आले आसता मा.गट विकास अधिकारी रोहा यांनी ही रोहा पोलीस व माझी दिशाभुल केली होती...सदर विषयात मा.अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजिप श्री अभिजीत बडे सर यांनी आपल्याच दालनात मा.अयुक्त कोकण विभाग यांच्याकडील पत्रावर दि:१५/0५/२३ रोजी सुनावणी आयोजित करून बारकाईने प्रत्येक पेपर व माझा तोंडी व लेखी जवाब घेतला आहे...श्री बडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते...व सुनावणीचा निर्णय दि:१९/0५/२३रोजी कागदपत्रांच्या आधारावर देण्यात येईल असे म्हटले होते...परंतु सुनावणीस तीन महिन्याची कालावधी पूर्ण होऊन ही निर्णय मिळत नसल्याने रायगड जिल्हा परिषद संबंधित भ्रष्टाचाराविरुद्ध एफआयआर दाखल होण्यास जाणुन बुजून दिरंगाई करीत आहे.. असे माझे ठाम मत झाले आहे...तसेच संबंधित भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई होउ नये म्हणुन वरिष्ठांना मॅनेज केलेच्या चर्चा संबंधित ग्रामसेवक यांच्याकडून होत आहे...
वरिष्ठांना मॅनेज केलेने कारवाई होत नसल्याची चर्चा...
सदर कामातील १२नंबर फॉर्मवर ठेकेदाराची सही कोणी केली? संबंधित ठेकेदार यांनी केलेली कामाची मागणी ग्रामपंचायतकडुन ठेकेदारास काम देणे बाबत केलेले ठराव व ठेकेदारास काम करण्यास दिलेला पत्र? अशा स्वरुपाची माहीती ग्रामपंचायत खांबेरेकडे मागणी केली असुन प्रथम आपिल अधिकारी श्री फरतडे यांचा आदेश असताना ग्रामसेवक श्री राजेंद्र पाटील यांनी जाणुन बुजून माहिती देणेस टाळाटाळ करीत आहेत... आपिलार्थी यांना ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यामार्फत माहिती देण्याच्या विषयात फसवणूक करीत आहे...हा सर्व प्रकार भ्रष्टाचार उघड होउ नये असं असुन या सबंधित ग्रामसेवक यांचे पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय लोकप्रतिनिधी असल्याचे समोर येत आहे...सदर विषयात वरिष्ठांकडून दखल घेउन चौकशी अंत कारवाई न झाल्यास मी अपील करणारा नाव शहनवाज मुकादम असुन मी घेतलेला आत्मदहनाचा निर्णय ठाम असुन तसं निवेदन ही देण्यात येणार आहे...

