महाराष्ट्र वेदभुमी

खांब ग्राम पंचायतीचा भाजी मार्केट झाडी गवताच्या विळख्यात,अखेरच्या घटकेत...बातमी मागील बातमी....खांबच्या भाजी मंडई मार्केटने घेतला मोकळा श्वास,बातमीची घेतली दखल गवत झाडी झुडप केली स्वच्छ



कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

पत्रकार श्याम लोखंडे यांच्या कार्यतत्परता आढव्यामुळे सबंधित ग्रामपंचायतीने काटेरी झुडपे व गवत कापून काढल्याने भाजी मंडई इमारतीला मिळाला मोकळा श्वास 

रोहा तालुक्यातील खांब ग्राम पंचायत हद्दीतील विकास कामांवर अनेक नागरिकांची बोंब सुरू असल्याचे सत्य समोर आले आहे...त्यामुळे शासन योजनेअंतर्गत केलेली विकास कामे टिकतात की नाही यावरच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.. तर हद्दीतील भाजी मंडई इमारत ही काही तीन चार वर्षापूर्वी काही लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आली... मात्र त्यात बाजार कधी सुरूच झाले नाही... तर सदरच्या इमातीमध्ये तसेच बाजूला काटेरी झुडपे व गवताचे भयान पसरले होते ...आमचे पत्रकार श्याम लोखंडे यांच्या कार्य तत्परता आढवामुळे येथिल परिस्थिती वृत दै.महाराष्ट्र वेदभूमीमध्ये छापून आले त्याची दखल तत्काळ सबंधित ग्रामपंचायतीने तेथील काटेरी झुडपे व गवत कापून काढल्याने तसेच स्वच्छ केल्याने सदरच्या भाजी मंडई इमारतीला आता मोकळा श्वास मिळाला आहे... परंतू नव्या बनवलेल्या या इमारतीची अवस्था गंभिर असल्याचे दिसून येते आहे.. तर मागे असलेले तलाठी कार्यालयाला देखील सुटकेचा श्वास मिळाला असल्याने येथील नागरिकांनी दै महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्रांचे आभार मानले आहेत...

दै.महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्र परिसरातील नागरीकांसाठी नेहमीच राहील जागृत आणि तत्पर.. 

सदैव गजबलेली खांब बाजारपेठेत पंचवीस ते तीस गावांचा समावेश येतो...त्यासाठी बाजारपेठेत एकाच ठिकाणी ग्राहकांना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी तेथील ग्राम पंचायत हद्दीत तसेच खांब नाक्यावर विविध योजने अंतर्गत भाजी मंडई इमारत उभारण्यात आली बहुचर्चेत असलेल्या खांब ग्राम पंचायतीची मोठी उलाढाल असल्याने तसेच स्थानिक नेत्यांचेही  कृपाशीर्वादा असल्याने विकास कामांची खैरात मात्र केलेली विकास कामे ही किती काळ तक धरू शकतात यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असल्याने मागील तीन चार वर्षापूर्वी येथील ग्राम पंचायत हद्दीत विवीध विकास कामांसाठी ग्राम सेवक कॉटर्स पाडून दुसऱ्या ठिकाणी असलेले हे भाजी मार्केट त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आले... तदनंतर करोनाची लाट सरू झाली इमारत झाली मात्र त्यात भाजी मार्केट सुरूच झाले नसल्याने तसेच ग्राम पंचायतीच्या दुर्ल्षितपणाच्या धोरणांमुळे लाखो रुपये शासनाचे खर्च करून बांधण्यात आलेली भाजी मार्केट इमारत गवताच्या व झाडांच्या विळख्यात सापडली होती.. तीची दुरवस्था झालेली बघून ती अखेरच्या श्वास घटका मोजते की काय? या अवस्थेत तसेच त्या मागे खांब गावचे तलाठी कार्यालय हे देखील दिसेनासे झाले असल्याची बातमी दै.महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन या इमारतीत तसेच बाजूला भयानक वाढलेली ही काटेरी झुडपे आणि गवत काढण्यात आल्याने व स्वच्छ केल्याने तिला तसेच तिच्यामागे असलेल्या तलाठी कार्यालयाला आता मोकळा श्वास मिळाला आहे... त्यामुळे खांब परिसरातील अनेक नागरीकांनी वृत्त पत्राचे विशेष सामजिक बांधिलकीतून अभिनंदन करत आभार मानले आहेत...


Post a Comment

Previous Post Next Post