महाराष्ट्र वेदभुमी

दुरून डोंगर साजिरे...डोळ्यांना आनंद आणि मनाला भुरळ पडणारा सह्याद्री आपले रौद्रयरुप धारण करतो तेव्हा मात्र त्याच्यापुढे कोणाची एक चालतं नाहीं...


निलेश जाधव: (गोवे-कोलाड)

मेघ राज्याचे आगमन झाल्यानंतर सह्याद्रीकडे पाहता कधी मनाला भुरळ पडते...आणि आपण सह्याद्रीचा होऊन जातो....

पावसाळ्यातील सह्याद्रीचं रूप म्हणजे नखशिखांत नटलेल्या एका लावण्य देखण्या स्त्री पेक्षा ही दिसतं सुंदर रूप आणि तिच्याकडे पाहत असता , बस्स बगावं आणि बघतच रहावं असच वाटतं ...अश्या ह्या सह्याद्रीचे वर्णन करताना खर तर तिला दिलेली विभूषणे ही तिच्या सुंदरतेपुढे फिकी सुद्धा पडतात...परंतु ज्या वेळी डोळ्यांना आनंद आणि मनाला भुरळ पडणारा हा सह्याद्री आपले रौद्ररुप धारण करतो त्यावेळी त्याच्यापुढे कोणाचे एक चालत नाहीं...असेच काहीसे पावसाळ्यात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून असंख्य उंचावरून समुद्राच्या शोधात पडणारे धबधबे आणि त्यांचा आनंद घेणारी आत्ताची तरुणाई हे एक वेगळं समीकरण बनलं आहे...

दोन युवकांचा पाय सरकल्याने पडले पाण्यात..एक तरुण बचावला..एकजण दरीत कोसळला

शनिवारी दि. १२ऑगस्ट/२०२३ रोजी हैदराबाद या जिल्ह्यातून सह्याद्रीच्या कुशीत बाघडण्यासाठी चार युवक ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जोतिर्लिंग अर्थातच भीमा शंकर येते आले होते...जोतिर्लिंग पाहून झाल्यानंतर हाकेच्या अंतरावर सुप्रसिद्ध असलेल्या काळू धबधबा येथे हे तरुण ट्रेकिंगसाठी गेले.. काळू धबधब्याचा घाटमाथा सर करताना त्यातील दोन युवकांचा पाय सरकल्याने ते खाली पाण्यात पडले...त्यातील एक तरुण काठावर पडल्याने कसा बसा वर आला... तर दुसरा युवक हा वाहत्या पाण्याबरोबर खाली वाहत जाऊन सुमारे ६०-७० फूट उंचावरून खाली दरीत कोसळला... वय वर्ष २९ अभिषेक रावतकर असे या इसामाच नाव होते..आपला मित्र आपल्या डोळ्यासमोर दरीत कोसळताना पाहून ते तीन मित्र हातबल झाले...आणि घडलेला प्रसंग काळू धबधब्या जवळील गावातील गावकऱ्यांना त्यांनी सांगितला...गावकऱ्यांनी आपत्ती कालीन व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कार्यरत असलेल्या संस्थाना या गोष्टीची माहिती दिली.. गेली ६ दिवस महाराष्ट्रातील नामांकित संस्था त्याठिकाणी शोध मोहीमेवर कार्यरत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचा माघ लागत नव्हता...

६ दिवसानंतर अवघ्या ३० मिनिटात कोलाड रेस्क्यू टीमने फॉलच्या कपारीतून मृतदेह बाहेर काढून  कुटुंबाकडे सोपवले...

ठाणे जिल्हा मुरबाड तालुक्यातील सभापती मिलिंद जी घरट यांनी आपत्ती कालीन व्यवस्थापणासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेली महेश सानप यांची कोलाड रेस्क्यू टीम ( वाइल्डर वेस्ट एडवेंचर रेस्क्यू टीम कोलाड/SVRSS)यांच्याकडे संपर्क केला.. महेश सानप आपल्या सहकाऱ्यांना हरेश सानप , सागर दहींबेकर यांना घेऊन सकाळी ७.००वा आपल्या राहत्या घरुन निघाले आणि सुमारें ११.३० च्या सुमारास घटनास्थळी पोहचले... घटनास्थळी पोहचता दरीत कोसलेल्या इसामाचे आईवडील त्यांच्या समोर पाया पडू लागले... मुलाच्या काळजीने व्याकुळ झालेली आई वडील हातबल होऊन आक्रोश करीत होते अशा अवस्थेत हरेश सानप आणि सागर दहींबेकर यांनी पाण्याच्या फोर्सचा आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्याच्या विरुद्ध दिशेने  शोध मोहीम चालू केली... आणि अवघ्या ३० मिनिटात त्यांना त्या इसमाची मृत अवस्थेत देह फॉलच्या कपारीत अडकलेला निदर्शनास आला...तरी वरून पडणारा पाऊस अक्राळ विक्राळ रूप धारण केलेला धबधबा आणि सोसायटयाचा सुटलेला वारा या कशालाच न जुमानता ते पाण्यातून डुबकी घेत त्या मृत इसामाजवळ पोहचले आणि  टीमच्या साह्याने त्या मृत इसमास फॉलच्या कपारीतून बाहेर काढून मृतदेह पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाकडे सोपवले...

तरुणांनी सह्याद्रीमध्ये हिंडताना काळजी घ्यावी रेस्क्यूसाठी प्रसिद्ध असलेले हरेश सानप यांनी सांगितले

वरील प्रसंग अनुभवताना ,हातबल झालेले वडील , आपल्या मुलाला या अवस्थेत पाहून वेड्यासारखी रडणारी आई हे दृश्य अनुभवताना तरुणांनी सह्याद्रीमध्ये हिंडताना स्वतःची काळजी घ्यावी असे रेस्क्यूसाठी प्रसिद्ध असलेले हरेश सानप यांनी सांगितले....


Post a Comment

Previous Post Next Post