रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आत्मा व कृषी विभगांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
अलीकडच्या काळात पौष्टिक तृणधान्य व रानभाज्यांचे आहारातील प्रमाण कमी होत चालले आहे....त्यामुळे तृणधान्या विषयी जागृती व्हावी यासाठी आपल्या देशाच्या पुढाकाराने २०२३ हे वर्ष आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे...या कारणाने कृषी विभागाने तृणधान्याविषयी प्रचार प्रसिद्धीची मोहीम हाती घेतली आहे... त्यासाठी महिलांना पौष्टिक तृणधान्य व रानभाज्यांची ओळख, आहारातील महत्त्व तसेच पौष्टिक तृणधान्य व रानभाज्यांपासून बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची माहिती होण्यासाठी रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आत्मा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते...
आकर्षक पद्धतीने नाविन्यपूर्ण भाज्या तयार करून केली मांडणी
तळा तालुक्यातील मेकडे हॉल येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते... रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेमध्ये ४३ महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन रानभाज्या प्रदर्शनामध्ये २३ प्रकारच्या रानभाज्या व माहिती प्रदर्शीत केली...पाककला स्पर्धेमध्ये ज्वारीचे थालीपीट,भारंगीची भाजी,कार्टुली भाजी,नाचणीची पुरणपोळी,ओव्यांच्या पानांची भाजी,कोवळ्या बांबूची भाजी,सुरणाचे स्टेफिंग रोल,रानभाजी पॅटिस,नाचणी आप्पे,टेहरीचे पराठे,नाचणीची डोसा, इडली,रानटी केळ फुलांचे कटलेट,करटोली सँडविच,करटोली माठ पिझ्झा अश्या अनेक नाविन्यपूर्ण भाज्या तयार करण्यात आल्या होत्या.. व भाज्यांची मांडणी देखील आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती...
तीन विजेत्यांची निवड करून १५ ऑगष्ट स्वतंत्र दिनी करण्यात येणार पुरस्काराचे वितरण
नवनवीन पदार्थ पाहताना या स्पर्धेसाठी आलेले प्रेक्षक सुद्धा भारावून गेले होते..कार्यक्रमास नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे ,आर डी सी सी संचालक ज्ञानेश्वर भोईर,तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे ,मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, कृषी पर्यवेक्षक जितेंद्र गोसावी ,आत्मा बीटीएम सचिन लोखंडे,कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते...रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुख्याधिकारी माधुरी मडके, नायब तहसीलदार सुरेखा घुगे,प्रकल्प अधिकारी दिपाली शेळके,प्रगतशील शेतकरी मधुकर वारंगे यांनी कामकाज केले...सदर स्पर्धेमध्ये प्रथम तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे...व १५ ऑगष्ट स्वतंत्र दिनी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे आनंद कांबळे यांनी सांगितले...
