रायगड जिल्हा एकलव्या सेवा सामाजिक विकास सेवा संस्था रायगड व माणगाव तालुका आदिवासी कातकरी सेवा संस्था. कै जाणू कोळी पुरस्कृत या संघटनेच्या विद्यमाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...यावेळी प्रथमता समाजसेवक कै जाणू कोळी व कै.के पी पवार यावेळी या आदिवासी समाजसुधारकांचे तसेच आदिवासी क्रांतिवीर यांचे पूजन करण्यात आले...रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरसालवाडी येथील मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी बांधवांना श्रद्धांजली वाहिण्यात आली... आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाचे महत्त्व सांगण्यात आले...
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार्यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन तसेच समाजासाठी झटणाऱ्या मान्यवरांचे केले गुणगौरव
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा आदिवासी मित्र पुरस्कार देऊन तसेच समाजासाठी झटणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव करण्यात आला...आदिवासी दिन कार्यक्रमामध्ये आदिवासी नृत्य वेगवेगळ्या कलागुणांनी सादरीकरण करण्यात आले...समाजसेवक कै.जाणू कोळी पुण्यतिथी निमित्ताने संतोष निकम रोहा यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले... तर कै. के पी पवार यांच्या स्मरणार्थ खेळरत्न पुरस्कार कु. आर्यन अरुण पाटील यांना देण्यात आला... तर माणगावचे ज्येष्ठ पत्रकार अरुण पवार,सुतारवाडीचे जेष्ठ पत्रकार हरिचंद्र महाडिक, आदिवासी प्रयत्न करणारे गणेश पवार साई माणगाव, यांना तसेच डॉक्टर बालाजी केंद्रे,निजामपूर यांना तसेच आदिवासी समाजातील तरुणांना व रोजगारासाठी व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष दत्तूशेठ पवार निजामपूर यांना तसेच निराधार मुलांना मदत करणारे जीनियस मैत्री कुलचे किशोर दादा जगताप गणाई परिवार यांना तसेच शिवाजी नाडकर इत्यादी मान्यवरांना आदिवासी मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले...आदिवासी क्षेत्रात तसेच आदिवासी व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यार्यांचा सत्कार करण्यात आलाा सौ दीपाली रविंद्र नाईक सुधागड पाली हिचा आदिवासी उद्योजिका म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला... तसेच उन्हातानामध्ये रानभाज्या विकणाऱ्या आदिवासी महिलांना सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला...
समाजसेवक महेश मोरे यांनी आदिवासी बांधव एकत्रित येणे ही काळाची गरज आहे असे सांगितले
यावेळी आदिवासी बोली भाषेमध्ये आदिवासी आणि विविध गीतांवर नृत्य सदर करण्यात आले...यावेळी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना समाजसेवक महेश मोरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की आदिवासी बांधवांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे... रात्र वैऱ्याची आहे कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका तुम्ही एकत्र आला तरच तुमचा विकास होईल...यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.. व्यासपीठावर माणगावचे नगरसेवक रत्नाकर उभारे पाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक राम पवार महेश मोरे. नगरसेविका लक्ष्मीताई जाधव, शंकर कोळी राम जाधव व्यासपीठावर उपस्थित होते... यावेळी येरदच्या खालुबाच्या पथकाने विशेष प्रात्यक्षिक दाखवण्यात आली... कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिवा पवार,राम कोळी मारुती पवार इंदुताई पवार ताराताई जाधव शंकर कोळी धर्मराज कोळी महादेव कोळी त्रिभुवन पवार,केतन पवार, मधुकर पवार. अनंता पवार. नामदेव जाधव भास्कर पवार, स्वातीताई मोरे काशीराम वाघमारे, येरद वन मित्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी तसेच माणगाव तालुका आदिवासी कातकरी समाजसेवा संस्था जानू कोळी पुरस्कृत संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते...
.jpeg)