तालुक्यातील हजारो तरुणांनी कंपनीस हवे असलेले आय.टी.आय. डिप्लोमा, डिग्री असे वेगवेगळे कोर्स पूर्ण केले असून सुद्धा आजतागत ते बेरोजगारच ...
जेएसडब्लू कंपनी विरोधात १२ ऑगस्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जनआंदोलन करण्यात येणार आहे... असे शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले... जिंदाल स्टील वर्क्स ही आशिया खंडातील लोखंड उत्पादनात सर्वात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते... पेण तालुक्यातील वडखळ डोलवी येथील आपली कंपनी म्हणजे आपल्या भागातील अशिक्षित व प्रशिक्षित तरुणांना रोजगारासाठी मोठी संधी मिळू शकते... परंतु दुर्दैवाने कंपनी प्रशासन स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य न देता परप्रांतीयांचा जास्त भरणा करत आहे... महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार ८०% स्थानिकांना कंपनीत सामावून घेणे अनिवार्य असून, कंपनीकडून राज्य शासनाचे ८०% स्थानिकांना नोकर भरतीचे धोरण राबविले जात नाहीत... तसेच येथे कंपनीमार्फत होणाऱ्या गैर व्यवस्थेचा आणि प्रदूषणाचा फटका सुद्धा स्थानिकांनाच बसत आहे... तालुक्यातील हजारो तरुणांनी कंपनीस हवे असलेले आय.टी.आय. डिप्लोमा, डिग्री असे वेगवेगळे कोर्स पूर्ण केले असून सुद्धा आजतागत ते बेरोजगारच आहेत... स्थानिकांना कंपनीत नोकरी देण्याचे टाळत असल्याचे ही निदर्शनास येत आहे... या व इतर सर्व बाबींविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे...
उपजिल्हा प्रमुख सर्व तालुका प्रमुख यांच्या नेतृत्त्वाखाली जनआंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिली माहिती
पेण तालुक्यातील वडखळ, डोलवी परिसरातील जेएसडब्ल्यू कंपनीतील अनेक महत्त्वाच्या समस्यांसाठी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णू पाटील, संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा प्रमुख अनील नवगणे, जिल्हा संघटीका दिपश्री पोटफोडे, युवासेना जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे व सर्व उपजिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख यांच्या नेतृत्त्वाखाली आणि शिवसेना नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उपनेते विजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जनआंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिली.
काय आहेत मागण्या ?
१. स्थानिक भूमिपुत्रांची नोकर भरती झालीच पाहिजे
२. पाटणसई ते डोलवीमधील ४५ गावांना फिल्टर पाणी पुरवठा झालाच पाहिजे
३. बार्जेसच्या वाहतुकीसाठी, खाड्यांची खोली वाढविली. बार्जेसच्या लाटांनी खारबंदिस्ती बांध फुटून पिकत्या भातशेतीत खारेपाणी शिरून शेती नष्ट झाली... त्याठिकाणी कांदळवनाची झुडपे वाढली आहेत... तसेच ढोंबी, माचेला, गडब-कारावी येथील सुमारे २००० एकर पिकती शेतजमीन खारबंदिस्ती अभावी नष्ट झाली... शेतीवर अवलंबून कुटुंबाचा रोजगार गेला त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे...
४. कंपनीच्या हवेतील प्रदूषणामुळे परिसरातील घरांवर काळ्या राखेचे थर बसले आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
५. कंपनी मार्फत रसायनयुक्त पाणी धरमतर खाडीत सोडल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दुर्गंधी व उघाडींचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यश आले नाही तर पाठपुरवठा करून न्याय मिळवू असे न झाल्यास कंपनीच्या बस बंद करण्यात येतील वेळ आल्यास आंदोलन तीव्र करून कंपनीला टाळे लावू जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला इशारा
स्थानिकांना रोजगार आणि इतर मूलभूत गरजा मिळत नाहीत. तसेच इतर प्रश्नांबाबत कोणीही आवाज उठवायला तयार नाही... कंपनीच्या मनमानी कारभारावर बोलायला कोणीही तयार नाही... म्हणूनच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढाकार घेऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी दि. १२ ऑगस्ट २०२३ रोजी जे.एस.डब्ल्यू कंपनी गोवा गेट येथे सकाळी ११.०० वाजता या मोर्चाचे आयोजन केले आहे... असे असले तरी जर या आंदोलनातून यश आले नाही तर सातत्याने पाठपुरवठा करून न्याय मिळवू, असे न झाल्यास कंपनीच्या बस बंद करण्यात येतील... वेळ आल्यास आंदोलन तीव्र करून कंपनीला टाळे लावू असा इशारा जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व जिल्हासंपर्क प्रमुख विष्णू पाटील यांनी पेण शिवसेना कार्यालया येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले...
