महाराष्ट्र वेदभुमी

गोळ्या घालून गेटमनची हत्या,तिसे कोलाड रेल्वे फाटकाजवळ गोळीबाराची घटना,आंबेडकरी वर्गात संतापाची लाट,कोलाड नाका बंद


कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

कोकण रेल्वे मार्गावर रोहा तालुक्यातील कोलाड रेल्वे स्टेशन अंतर्गत असलेल्या तिसे रेल्वे फाटक येथे गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक गावचे रहिवासी चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने सोमवारी दुपारी गोळीबार केला..यात कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर मारेकरी फरार झाले असून त्या प्रीत्यर्थ आज मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी कोलाड आंबेवाडी नाक्यावर त्याच्या मारेकऱ्यांना अटक करा यासाठी आंबेडकर कार्यकर्तेनी कोलाड आंबेवाडी नाका बंद पुकारत आंदोलन केले ...

दरम्यान चंद्रकांत कांबळे यांचा मृतदेह सोमवारी कोलाड प्राथमीक आरोग्य केंद्रात पूढील वैद्यकीय तपासण्यांकरिता पाठवण्यात आला आहे... तिसे रेल्वे फाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे हे दुपारी जेवण करीत होते... त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने समोरून येत त्यांच्यावर गोळी झाडली...कापाळावर गोळी लागल्याने चंद्रकांत कांबळे यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला... या घटनेनंतर गोळीबार करणारा अज्ञात व्यक्ती फरार झाल्याचे समोर आले आहे...गोळीबाराचे वृत्त कळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली...या घटनेने कांबळे कुटुंबासह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे...गोळीबाराच्या अनपेक्षीत प्रकाराने रोहा,कोलाड यासह रायगड जिल्हा हादरून गेला आहे..तर कांबळे यांची हत्याच असल्याने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार दि.२२ऑगस्ट रोजी कोलाड आंबेवाडी नाक्यावर त्यांच्या मारेकरी याला जोपर्यंत अटक केली जात नाही...तोपर्यंत आम्ही मयत कांबळे यांचा प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भीम प्रतिज्ञा सदरच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली...रेल्वे प्रशासनाच्या विरोधात पोलिसांसमोर आव्हान केले आहे...हत्येच्या निषेधार्थ कोलाड आंबेवाडी नाक्यावर आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून बंद पुकारण्यात आला...येथील व्यापारी नागरिकांनी कांबळे यांच्या हत्येचा निषेध म्हणून संपुर्ण दुकाने व बाजार पेठ बंद करण्यात आली होती...यावेळी संपुर्ण कोलाड नाक्यावर पोलिस तैनात करण्यात आली होती.....

आंबेडकर चळवळीसह रेल्वे संघटनेत चंद्रकांत कांबळे यांचे मोठे काम होते...ते रेल्वे संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी होते... त्याच अंतर्गत वादातून हत्या झाली असावी...असा आरोप आता आंबेडकरी चळवळ संघटनाकडून केला जात आहे...तर मयत कांबळे यांच्या फरार मारेकऱ्याचा शोध लागलाच पाहिजे...एक ना अनेक अन्याय आता आमच्या समाजावर होत आहे...त्यामुळे आम्ही आता गप्प बसणार नाही...तर कांबळे यांची भर दिवसा कामावर असतानाच हत्या केली जाते...याचे कारण काय? असे तर्क वितर्क लावले जात असल्याने हत्याऱ्याला अटक करा...तरच कांबळे यांचा शेव ताब्यात घेतला जाईल..या भूमिकेवर कोलाड रोहा रायगड जिल्हयातील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते ठाम असल्याचे चळवळींचे नेते भयाभाई जाधव यांनी सांगितले...

सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली असून,लॅबचे तज्ज्ञ, डॉगस्कॉड, ठसे तज्ज्ञ, बॉम्ब निकामीकरण पथक (बीडीडीएस) तत्काळ आठ पथके घटनास्थळी दाखल झाले होते... तसेच त्यांनी तपास कामाला युद्ध पातळीवर सुरुवात केली असल्याचे अपर पोलीस अधिक्षक झेंडे यांनी काल पत्रकाराना घटनास्थळी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post