नेरूळ प्रतिनिधी जान्हवी भोईर
नेरूळ सेक्टर २० मध्ये नवीन विद्युत वाहिनीचे उपाय योजना
नेरूळ येथील सेक्टर २० या ठिकाणी राम मंदिर परिसरातील सर्व ठिकाणी नवीन विद्युत वाहिनीचे काम करण्यात आले...या परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता...त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नेरूळ गावचे भाजपचे कार्यकर्ते माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून खंडित विद्युत पुरवठा या अनुषंगाने योग्य तो पाठपुरावा करून त्या परिसरात ३०० स्क्वेअर एम एम एल टी केबल टाकण्यात आली आहे...या केबलमुळे या परिसरातील खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे...
भाजपचे नेते माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांचा पाठपुरावा
भाजपचे नेते माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी पाठपुराव्यात केलेल्या या उपाय योजनेबददल येथिल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे...
