रोहा प्रतिनिधी:शहानवाज मुकादम
तालुक्यातील खैरेखुर्द येथील ग्रामपंचायतीची आज १४ ऑगस्ट रोजी तहकूब ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले... या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आल्या...चर्चेनंतर महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली...यावेळी एकमताने खैरेखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील तरुण युवक अनिल साळावकर यांची महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी व पत्रकार शहानवाज मुकादम यांची दुसर्यांदा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली...
माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान
माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे राबविण्यात आले...या अभियानाचा मुख्य हेतू गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करत गावातील लहान मोठे तंटे गावातच सोडवून पोलिसांवरील ताण कमी व्हावा अशी शासनाची योजना होती...आज झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदाची निवड ही बिनविरोध करत त्यांनी या पदासाठी तरुणांना संधी देत पाच गावांची बिनविरोध परंपरा जपत दुसऱ्या गावांच्या समोर त्यांनी एक आदर्श निर्माण करुण दिला आहे... यावेळी कार्यकाळ संपलेले माजी तंटामुक्त अध्यक्ष गोपीनाथ देवळे व उपाध्यक्ष शहानवाज मुकादम यांच्या एका वर्षाच्या काळावधी एकही तंटा झाला नसुन एक ही तंटामुक्त समीतीची सभा घेण्यात आलेली नसल्याने यांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला...
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
यावेळी ग्रामसेवक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नुतन अध्यक्ष अनिल साळावकर व पुन्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले शहानवाज मुकादम यांनी गावात घडणारे लहान मोठे तंटे पोलीस स्टेशनला न जाऊ देता गावातच सोडवावीत व तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडावी व मनोगताच्या शेवटी उपस्थितांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या...
