महाराष्ट्र वेदभुमी

खांब ग्राम पंचायतीचा भाजी मार्केट झाडी गवताच्या विळख्यात,अखेरच्या घटकेत.

कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

विकासाच्या मुद्यावर स्थानीक पुढाऱ्यांची चर्चा..  विकास कामे टिकतात की नाही यावरच आता निर्माण झालाय प्रश्नचिन्ह

रोहा तालुक्यातील खांब ग्राम पंचायतीच्या हद्दीत गेली तीन चार वर्षापूर्वी नव्याने उभारलेली भाजी मंडई इमारत झाडी गवताच्या विळख्यात सापडली असुन जणू ती अखेरची घटकेत आहे की काय हेच चित्र बाजारात बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यास मिळत आहे... त्यामुळे आता खांब ग्राम पंचायतीची विकासाबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे...मुंबई गोवा महामार्गावर वसलेला खांब नाक्यावरील बाजार पेठेची ओळख ही ब्रिटिश राजवटीपासून असल्याचे नेहमी बोलले जात आहे...तर सदैव रहदारीने गजबजलेला या मार्गावरील ठिकाण म्हणजे खांब आणि वरसगाव नाका हे असले तरी कायम विकास कामे आणि आणि सुशोभीकरणापासून  वंचीत आहेत... हे सत्य नाकारता येत नाही... तर केलेल्या विकास कामांबाबत देखील चांगलीच बोंब सुरू असते विकासाच्या मुद्यावर स्थानीक पुढाऱ्यांची चर्चा नेहमीच असते तर केलेली विकास कामे टिकतात की नाही यावरच आता प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे...

ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे लाखो रुपये शासनाचे खर्च करून बांधण्यालेली भाजी मार्केट इमारत गवत व झाडांच्या विळख्यात 

सदैव गजबलेली खांब बाजारपठेत पंचवीस ते तीस गावांचा समावेश येतो त्यासाठी बाजारपेठेत एकाच ठिकाणी ग्राहकांना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी तेथील ग्राम पंचायत हद्दीत तसेच खांब नाक्यावर विविध योजने अंतर्गत भाजी मंडई इमारत उभारण्यात आली.. बहुचर्चेत आसलेल्या खांब ग्राम पंचायतीची मोठी उलाढाल असल्याने तसेच स्थानिक नेत्यांचेही कृपाशीर्वाद असल्याने विकास कामांची खैरात मात्र केलेली विकास कामे ही किती काळ तक धरू शकतात...यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असल्याने मागील तीन चार वर्षापूर्वी येथील ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांसाठी ग्रामसेवक कॉटर्स पाडून दुसऱ्या ठिकाणी असलेले हे भाजी मार्केट त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आले.. तदनंतर करोनाची लाट सुरू झाली.. इमारत झाली मात्र त्यात भाजी मार्केट सुरूच झाले नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणांमुळे लाखो रुपये शासनाचे खर्च करून बांधण्यात आलेला भाजी मार्केट इमारत गवताच्या व झाडांच्या विळख्यात सापडली.. असल्याने तिची दुरवस्था झालेली दिसत असून ती अखेरच्या श्वास घटका मोजते की काय या अवस्थेत असताना दिसत आहे... .

Post a Comment

Previous Post Next Post