महाराष्ट्र वेदभुमी

आघोरी जादूटोणा विद्यने रोह्यात खळबल, धामणसई ग्रामस्थांची सतर्कता पोलिसांनी आवळल्या मुसक्या.


कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

रोहा तालुक्यातील मुसक्या आवळत अटक करण्यात आल्याची  दिली पोलीस प्रशासनानी दिली माहिती

धामणसई येथे धक्कादायक, अघोरी कृत्याचा ग्रामस्थांनी पर्दाफाश करत काळी विद्या आघोरी जादूटोणा प्रकारावर मात करत, पैशाचा पाडणार अशा जादूटोणा भोंदुंच्या रोहा पोलिसांनी चांगल्याच मुसक्या आवळत ताब्यात घेतले..रोहा तालुक्यातील धामणसई गावाच्या हद्दीत शनिवारी अघोरी विद्यासारखा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने रोहा तालुक्यात एकच खळबळ उडाली... येथील बौद्धवाडी शेजारील स्मशानभूमी व लहान मुलांच्या शाळेत फुले, अबिर गुलाल, लिंबू, टाचणी असल्याचे येथील ग्रामस्थांनच्या निदर्शनास येताच दोन अनोळखी व्यक्तींना काहीतरी अमानुष अघोरी विद्या, जादूटोणा करताना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडले आणि चांगलाच दम दिला. त्याच झटापटीत काहीजण पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले... दरम्यान, अघोरी जादूटोणा करणाऱ्यांत अनेकजण रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत...ते पैशाचा पाऊस पाडणार होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली....त्याच अनुषंगाने पोलीस तपास करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले आहे... तर अघोरी विद्या, जादूटोणा गुन्ह्याखाली संबधीत आरोपींना रात्रौ उशिरा त्यांच्या मुसक्या आवळत अटक करण्यात आल्याची माहितीही पोलीस प्रशासनानी दिली आहे...

धामणसईतील स्मशानभूमी व शाळेत अघोरी विद्या करत असल्याचा संशय ग्रामस्थांना आला संशय. 

तालुक्यात काही ठिकाणी भगतगिरी चालत असल्याचे अनेक वर्षांपासून उघडपणे बोलले जाते...या आदी मागील वर्षी असाच प्रकार कोलाड येथील चिंचवली तर्फे दिवाळी येथील आदिवासी वाडी भिरा फाट्यावरील गोदी नदीपात्र काटेवर आघोरी विद्या करत नरबळी म्हणून कोंबड्याचा बळी देत काळी बाहुली त्यावर लिंबू टाचन अभिर गुलाल अशी आघोरी विद्या करत जमिनित गाढून कृत्य करण्यात आले होते... त्यामुळे येथील आदिवासी नागरिकांनी तत्काळ कोलाड पोलिसाना संपर्क साधला होता... मात्र भोंदू बाबा मिळालेच नाहीत तोच प्रकार पुन्हा तालुक्यातील धामणसई गावाच्या हद्दीत शनिवारी धक्कादायक प्रकार घडला असून यात रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ६ ईसम कोलाड विभागातील व्यक्तीसोबत धामणसईतील स्मशानभूमी व शाळेत अघोरी विद्या करत असल्याचा संशय काही ग्रामस्थांना आला... माऊली कृपा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विचित्र पूजाअर्चा करीत असल्याने हे संशयीत लोक ग्रामस्थांच्या कचाट्यात सापडले... त्यांना विचारणा केली असता सर्वजण अक्षरश: भांबाहून गेले... आपली सुटका नाही, असे दिसताच काहींनी धूम ठोकत पळ काढला...त्यातील चार आरोपींना ग्रामस्थ विजय जाधव व ग्रामस्थांनी रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले....अघोरी विद्या करणाऱ्यांतील म्होरक्या पळून गेला, असे ग्रामस्थ विजय जाधव व विकास सानप यांनी सांगत जादुटोणा भगतगिरी करून काही काळी विद्या करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा अघोरी प्रकार उघडकीस आला...असल्याचे ग्रामस्थ विजय जाधव यांनी सांगितले.

संबधीत आरोपींना  अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.

याबाबत रोहा पोलिसांनकडून मिळालेल्या माहितनुसार जादूटोणा विद्याप्रकरणी आरोपी संतोष पालांडे वय ५० रा. रत्नागिरी, प्रदीप पवार वय ६० रा. रत्नागिरी, प्रवीण खांबल वय ४७ रा. रत्नागिरी, सचिन सावंतदेसाई वय ४९ रा. रत्नागिरी, दीपक कदम व ४१ रा. रत्नागिरी, मिलिंद साळवी व ५१ रा. रत्नागिरी, राजेंद्र तेलंगे वय ४२ रा. हेटवणे व इतर अनोळखी २ व्यक्तींविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व आघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करणे, समूळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे... संबधीत आरोपींना रात्रौ उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.

सुज्ञ ग्रामस्थांनी जादूटोणा डाव उधळून लावल्याने धामणसई विभागासह तालुक्यात ग्रामस्थांचे कौतुक 

रोहा तालुक्याच्या काही ग्रामीण भागात आजही देवदेवस्की, अघोरी विद्या करण्याचा प्रकार चालत असल्याचे चर्चेत आहे त्यात अघोरी विद्या करणाऱ्यांना अशिक्षीत सामान्य व्यक्ती एवढेच काय ? उच्चशिक्षीत सदन व्यक्तीही बळी पडत असल्याचे भयान वास्तव आहे त्यामुळे अनेक अशिक्षीत सामान्य लोक अज्ञानातून तर उच्चशिक्षीत लोक पापभिरू वृत्तीतून बळी पडले असल्याचे बोलले जाते... मात्र धामणसईतील ग्रामस्थ व विजय जाधव तसेच सुज्ञ ग्रामस्थांनी जादूटोणा डाव उधळून लावल्याने धामणसई विभागासह तालुक्यात या ग्रामस्थांचे कौतुक होत आहे ...

Post a Comment

Previous Post Next Post