रोहा प्रतिनिधी : शहानवाज मुकादम
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आंदोलन
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले.... दि:९ ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्ग वाकण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले...स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात बोंबाबोंब करण्यात आली...मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे... अनेक प्रयत्न करूनही महामार्गाच्या कामाला गती मिळू शकलेली नाही... त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे, प्रवाशांचे,रुग्णांचे, आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत... वडखळ ते इंदापूर या मार्गाची सध्या चाळण झालेली असुन वाहनचालक आपली वाहने पाली-खोपोली व नागोठणे-पोयणाड मार्गे जात आहेत..
महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य न थांबल्यास पुढील आंदोलन लोकप्रतिनिधीच्याच होणार दारात
महामार्गाच्या या दुरावस्थेकडे कोकणातील लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले...मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावसथेला गडकरी साहेब व शिंदे-फडणवीस जबाबदार नसुन कोकणातील लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत...गणेशोत्सव पर्यंत या महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य न थांबल्यास या पुढील आंदोलन लोकप्रतिनिधीच्याच दारात होणार असल्याचे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष व उपस्थित सर्व पत्रकारांकडुन जाहीर करण्यात आले...
