आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारंपारिक नृत्य,पारंपारिक वाद्य, यांची परंपरा जोपासत विविध क्षेत्रात आदिवासी बांधवांसाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
दि.०९/०८/२०२३ रोजी आदिवासी दिनानिमित्त रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी सामाजिक संघटना व माणगाव तालुका आदिवासी सघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी जागतिक दिन कुणबी भवन माणगाव जि.रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाला...आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारंपारिक नृत्य,पारंपारिक वाद्य, यांची परंपरा जोपासत विविध क्षेत्रात आदिवासी बांधवांसाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला..
शिक्षक वर्ग साई पंचक्रोशीतील हितचिंतक मित्रपरिवार व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर.पालकवर्ग तसेच तालुक्यातून दिल्या शुभेच्छा
साई विभागातील साई गावचे सुपुत्र श्री.गणेश नारायण पवार यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले गणेश पवार हे साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तसेच क्षत्रिय मराठा समाज संघ माणगाव -तळा या समाजाचे सचिव या पदावर कार्यरत असुन विविध क्षेत्रात,अनेक पदावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते समाज उपयोगी आदिवासी विद्यार्थी वर्गासाठी विविध शासकीय योजना असो किंवा आदिवासी बांधवांना व त्यांच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खुप प्रयत्न केले आणि करत आहेत... शिकलो तरच आपलीं प्रगती होईल शिक्षण घेणे म्हणजे वाघिणीचे दुध पिणे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही... हे मनाशी बाळगुन शिक्षण क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे...तसेच सामाजिक क्षेत्रात सुध्दा चांगली कामगिरी केली आहे.... ते हुशार,संयमी, हरहुन्नरी,चतुरस्त्र, मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व असुन प्रशासना मधला त्यांना दांडगा अनुभव आहे अशा गरीब शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,ता.प्रमुख गजानन अधिकारी,मराठा समाजाचे अध्यक्ष राजु मोरे,पत्रकार सिकंदर आंबोणकर, सामाजिक कार्यकर्ते बळीराम लाड,प्रशांत अधिकारी,अमीन जालगावकर,सुरेश वाघ,गोविंद ढवुळ,सुजित शिंदे सुभाष जाधव,अहमद बंदरकर,मिया सोलकर, निजाम कागदी,अनिस सोलकर,पांडुरंग मोरे, भारत महाडीक,साई हायस्कूल मधील शिक्षक वर्ग साई पंचक्रोशीतील हितचिंतक मित्रपरिवार व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या...पालकवर्ग तसेच तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मिळत आहेत...

.jpeg)