महाराष्ट्र वेदभुमी

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास १० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ



अलिबाग -:(जिमाका)

दि.९ /८/२४अल्पसंख्यांक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन-२०२३_२४ साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.१७ जुलै २०२३ च्या शासन परिपत्रकानुसार दि.१०ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे...

जिल्हा नियोजन तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड-अलिबाग श्री.ज.द.मेहेत्रे यांनी केले आवाहन

तरी रायगड जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी सन-२०२३_२४ या आर्थिक वर्षाकरिता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.१०ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावेत.. असे आवाहन जिल्हा नियोजन तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड-अलिबाग श्री.ज.द.मेहेत्रे यांनी केले आहे...



Post a Comment

Previous Post Next Post