गोरेगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह माणगाव येथे पडली पार..
दि.२६/०८/२०२३ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह माणगाव येथे पार पडली...सदर बैठकीत श्री.वलीद हुर्जूक रा.हरकोल यांची माणगाव तालुका अल्पसंख्याक समाज समन्वयक पदाचे नियुक्ती पत्र महाड,माणगाव, पोलादपूर चे शिवसेना नेते हनुमंत (नाना) जगताप यांच्या हस्ते देण्यात आले...
जेष्ठ शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित
त्यावेळी विधानसभा संघटक संजय घोसाळकर,सुधिर सोनावणे,ता.प्रमुख गजानन अधिकारी,महाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जगदीश पवार,विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे,विभाग प्रमुख शिवाजी गावडे,विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर,विभाग प्रमुख लक्षण म्हाळुंगे,विभाग प्रमुख संदेश कळंबे जेष्ठ शिवसैनिक अनिल मोरे,चंद्रकांत यादव, माणगाव ता.महीला संघटीका शिवानी म्हामुनकर,रंजना लुष्टे,योगीता मोरे,युवासेनेचे अक्षय कदम,संदेश घोसाळकर,रोहित पहेलकर तसेच जेष्ठ शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...त्यांच्या निवडीने पंचक्रोशी,मांजरवणे विभाग,गोरेगाव विभाग,लोणेरे विभागातून तसेच तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...