कोलाड प्रतिनिधी: (श्याम लोखंडे )
रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत भरता येत नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोकण जागर पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग आहे...सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचे हे आंदोलन असल्याचे मत मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले... रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत भरता येत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले... मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली आहे... या मुद्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली... कोकणी बांधवांनी जमिनी विकू नयेत या उलट आपल्याकडून चिरीमरीत घेतलेल्या जमिनी ह्या शंभर पट किंमतीने हे लबाड विकतील त्यामुळे आपली जमीन विकू नये असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं...
१५ वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळं अडीच हजार जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील कोलाड इथं राज ठाकरे बोलत होते...गेल्या १५ वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळं अडीच हजार जणांचा मृत्यू झाल्याचे राज ठाकरे म्हणाले.तरीही १७ वर्षापासून हा रस्ता का होत नाही?...याचे उत्तर म्हणजे तुम्हाला राग येत नाही...जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात...तुम्ही जागृत राहा असे आवाहन कोकणी बांधवांना राज ठाकरे यांनी केले.... कोकणी बांधवांना गेली अनेक वर्ष खड्डे सहन करावे लागतात...याचा तुम्हाला राग कसा येत नाही . या रस्त्यावर खड्यामुळे किती अपघात झाले असतील किती माणसे गेली असतील...आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं...सरकार कोणतही असो. आजचं असो किंवा कालचं असो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नसतो... रायगड जिल्ह्यातील कोलाड याठिकाणी राज ठाकरे बोलत होते..
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील ८ वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच युवा नेते अमीत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गाच्या गेली सतरा वर्ष रखडलेल्या कामासाठी कोकण जागर यात्रेनिमित्त रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ६ वाजल्यापासून सर्वजण मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील ८ वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा काढण्यात आल्या असून त्या यात्रेची सांगता समारोप हा कोकण मध्यवर्ती ठिकाण कोलाड आंबेवाडी नाक्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमूख उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांच्या तसेच यात्रेत सहभागी झालेल्या कोकण नागरिकांसमावेत उत्साहात समारोह करण्यात आला यावेळी ते बोलत होते...
मुंबई-पुणे रस्ता हा देशाला दिशादर्शक रस्ता आहे...ज्या महाराष्ट्राने देशाला आदर्श घालून दिला महाराष्ट्रातील मुंबई-गोवा रस्त्याची अवस्था काय ?
१९९५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, मुंबई-पुणे रस्ता दोन तासात पार करता येईल, असा तयार करायचा आहे. ज्या महाराष्ट्रानं प्रत्येक वेळी देशाचं प्रबोधन केलं...देशाला दिशा दिली...मुंबई-एक्सप्रेस झाल्यावर देशाला कळाले की अशा प्रकारचा रस्ता बांधला जाऊ शकतो... बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाल्याचे राज ठाकरे म्हणाले...या रस्त्यानंतर चांगले रस्ते होऊ लागल्याचे आणि मुंबई-पुणे रस्ता हा देशाला दिशादर्शक रस्ता आहे...ज्या महाराष्ट्राने देशाला आदर्श घालून दिला...त्या महाराष्ट्रातील मुंबई-गोवा रस्त्याची अवस्था काय आहे?असे राज ठाकरे म्हणाले...
आपल्याकडे कुंपनच शेत खात आहे
मुंबई-गोवा महामार्गावर नीट न करण्याचे कारण म्हणजे अत्यंत कमी किंमतीत कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेत आहेत... ज्यावेळी हा रस्ता होईल त्यावेळी १०० पट किंमतीन तुमच्या जमिनी व्यापाऱ्यांना हे लोक विकणार...त्यामुळं कोणीही जमिनी विकू नका...आपल्याकडे कुंपनच शेत खात असल्याचे आपलेच लोक आपल्या लोकाकडून कमी किंमतीनं जमिनी घेऊन जास्त किंमतीनं व्यापाऱ्यांना विकत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे,वैभव खेडेकर सरचिटणीस, अविनाश जाधव, वसंत मोरे , संदीप देशपांडे, अभिजित पानसे, रिटा गुप्ता, देवेंद्र गायकवाड,अमोल पेणकर,सह मनसे चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते...