महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड आंबेवाडी नाका येथे राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थित कोकण जागर यात्रेचा समारोप

 



कोलाड.प्रतिनिधी श्याम लोखंडे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये कोकण जागर यात्रेनिमित्त रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ६ वाजल्या पासून सर्वजण मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील ८ वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा काढण्यात येणार असून त्या यात्रेचा सांगता समारोप हा कोकण मनअध्यवर्ती ठिकाण कोलाड आंबेवाडी नाक्यावर होणार असल्याने रोहा कोलाड मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला असून सदरच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून पक्ष प्रमूख राजसाहेब ठाकरे येत असल्याने कोलाड आंबेवाडी येथील मनसे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणि झाला आहे. 


मुंबई गोवा महामार्गाच्या दूरवस्थेमुळे कोकणी माणूस संतापाने खदखदत आहे. या संतापाला वाट करून देण्यासाठी आणि ढिम्म सरकारचा निषेध करण्यासाठी नेमून दिलेल्या मार्गावरील पदयात्रा संपल्यानंतर कोकण जागर यात्रेचा समारोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी ठिक ५.३० वाजता कोलाड- आंबेवाडी नाका येथील मेन चौकात  होणार आहे तसेच सदरच्या पड यात्रेत सर्व समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अमोल पेनकर यांनी केले  आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post